वाधवान कुटुंब खाताहेत वरण, भात आणि आमटी ; कायद्यापुढे राजा असो वा रंक सगळे एक समान याची जाणीव या वाधवान कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने दिली करून

पाचगणी :- शासनाच्या निकषाप्रमाणे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या सर्वच नागरिकांना ज्याप्रमाणे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तोच सरकारी निकष सध्या पाचगणी येथे ठेवण्यात आलेल्या वाधवान कुटुंबियांसह 23 जणांना लावण्यात आला आहे .यामुळे कायद्यापुढे राजा असो वा रंक सगळे एक समान असतात अशीच जाणीव या करोडपती नव्हे तर अब्जपती असणाऱ्या वाधवान कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने करून दिली आहे. येस बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात जामीनावर असलेले उद्योगपती कपिल वाधवान व त्यांचे सोबत आलेले 22 असे एकूण 23 जणांना  सध्या पाचगणी येथे आहेत.
जिल्हा बंदीचे आदेशाचे उल्लेख उल्लंघन करून खंडाळा ते महाबळेश्वर असा  या सर्वांनी  8 एप्रिल रोजी प्रवास केला होता. या प्रकरणी प्रांताधिकारी महाबळेश्वर यांनी केलेल्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलीस ठाण्यात 23 जणांवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले .दरम्यान या 23 जणांना मागील सोमवारपासून पाचगणी येथील सेंट झेवियर्स हायस्कूल च्या इमारतीत इन्स्टिट्यूशनल  क्वारंटाईन   करण्यात आले आहे .अतिशय श्रीमंत आणि उच्चभ्रू असणाऱ्या वाधवान कुटुंबीयांना सध्या जेवणात डाळ, भात आणि आमटी देण्यात येत आहे .सरकारी पाहुणचारात दरवेळी महाबळेश्वर मध्ये दाखल होतानाच आपल्यासोबत लागणारे गोष्टी महाबळेश्वर येथील नामांकित बंगल्यावर जेवणासाठी लागणाऱ्या भाजीपाल्यासाठी ही स्वतंत्र गाडी करून हा भाजीपाला आणला जात असे . नेहमीसारखा त्या दिवशीही असाच बेत वाधवान कुटुंबांनी आखला असेल. मात्र राज्य शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत त्यानुसार प्रशासनाने या उद्योगपतींचे संपूर्ण कुटुंबीय शाळेत डांबून  ठेवलेले आहे. तसेच या उद्योगपतींचे सर्व फोन महाबळेश्वर पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता वाधवान कुटुंबीयांना डाळभात आमटीची चव चौदा दिवस तरी घ्यावी लागणार आहे .
दरम्यान, लोणावळा मध्ये वाधवान कुटुंबीय आपले नाव बदलून  लोणावळा येथे वास्तव्यास होते असा प्रकार चौकशी पथकाला समजला आहे. वाधवान  कुटुंबांची संपूर्ण चौकशी करण्यासाठी महाबळेश्वर पोलीस निरीक्षक बी.ए .कोंडूभैरी यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचे पथक नुकतेच लोणावळा येथे गेले होते. त्यांच्या चौकशीची एक फेरी पूर्ण झाली आहे .दरम्यान या चौकशीत आश्चर्यकारक अशी माहिती मिळाली की वाधवान    कुटुंब नाव बदलून तेथे राहिले होते. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाणार आहे व त्यासाठी या पथका ला
  शाळेत कक्षात प्रवेश नाकारण्यात आला असल्याने चौकशीसाठी 23 एप्रिल पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. लोणावळे येथील ज्या भागात राहिले होते त्या ठिकाणी पोलिस पथक चौकशी करून नुकतेच परत आले आहे .लोणावळ्याजवळील तुंगार्ली पीकॉक व्हॅली या सोसायटीत दोन बंगले वाधवान नी भाड्याने घेतले होते. हे दोन्ही बंगले मुंबईच्या एका धनिकाचे असून ते भाड्याने दिले जातात. या ठिकाणी असलेल्या केअरटेकर ची चौकशी पोलीस पथकाने केल्यावर हा नाव बदला बाबतचा प्रकार उघडकीला आला.इन्स्टिट्यूशन कोरंताईन कालावधी संपल्यानंतर वा धवन कुटुंबाच्या मागे अनेक चौकशी पथकांचा ससेमिरा लागणार आहे. सीबीआय बँक घोटाळ्यातील चौकशीसाठी वाधवान बंधूंना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. लोणावळ्यात ज्या वेळेला  वाधवान    कुटुंब राहण्यासाठी आले होते. तेव्हा त्याची नोंद  20 मार्चला पालिका प्रशासनाने केली होती. मात्र आठ एप्रिल रोजी लोणावळा सोडताना उद्योगपतीने पालिका प्रशासनाला काहीही माहिती दिली नसल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे.