Thursday, April 24, 2025
Homeठळक घडामोडीग्रंथमहोत्सव 2018 शुक्रवारपासून सुरु ; 100 स्टॉलचा सहभाग राहणार

ग्रंथमहोत्सव 2018 शुक्रवारपासून सुरु ; 100 स्टॉलचा सहभाग राहणार

सातारा (विंदा करंदीकर नगरी जि. प. मैदान) : सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीतर्फे 19 वा ग्रंथमहोत्सव 2018 दि. 5, 6, 7, 8 जानेवारी या काळात आयोजित केला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष शंकर सारडा व कार्यवाह शिरीष चिटणीस, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी दिली.
या ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ साहित्यिक व झी 24 तास मुख्य संपादक विजय कुवळकर यांच्या हस्ते व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान त्याच दिवशी सकाळी 8.30 वाजता ग्रंथदिंडीचे पूजन सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, जि. प. व न. पा. चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सातारा, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रंथप्रेमी नागरीक यांच्या उपस्थितीत होणार आहे. राजवाडा गांधी मैदान ते जिल्हा परिषद मैदान सातारा अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता जपूया देणं निसर्गाचे हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, प्रमुख म्हणून जिल्हा उपनिबंधक अ‍ॅड. महेश कदम तर डॉ. संदीप श्रेणी, उदय गायकवाड, मकरंद शेंडे, दिलीप कुलकर्णी यांचा सहभाग राहील. प्रास्ताविक देवीदास कुलाल, तर संवादक म्हणून प्रा. साहेबराव होळ काम पाहतील. सायंकाळी 7 वाजताा स्वरनिनाद प्रस्तूत बरसात सप्तसुरांची हा अवीट जुन्या, नव्या मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम होईल.
दि. 6 रोजी चला घडूया सकाळी 8.30 वाजता साहित्यिक डॉ. इंद्रजीत देशमुख यांचा कार्यक्रम होईल. प्रमुख म्हणून सातारा पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम सहाय्यक निबंधक सातारा तालुका बाळासाहेब तावरे, तर सूत्रसंचालन राजकुमार निकम करतील. सकाळी 11 वाजता संशोधकांच्या सहवासात विषयी साहित्यिक सागर देशपांडे मार्गदर्शन करतील तर प्रमुख म्हणून अ‍ॅड. दत्ता बनकर, विज वितरणचे कार्यकारी अभियंता सुनिल माने तर सूत्रसंचालन प्रल्हाद पार्टे करतील. दुपारी 3 ते 7 परिसंवाद होणार आहे. त्यासाठी साहित्य आणि राजकाारण : अनुबंध विषयी माजी आमदार डॉ. कांतीताई नलवडे, विजय चोरमारे, डॉ. शिवाजीराव देशमुख, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे सहभाग घेवून मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षपदी प्रा. डॉ. मनोहर जाधव तर प्रमुख म्हणून जि. प. उपमुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे तसेच सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिरीष चिटणीस करणार आहेत. सायंकाळी 7 वाजताा झी मराठी वरील लोकप्रिय संभाजी मालिकेतील कलाकारांचा सत्कार सोहळा खा. श्री. छ उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ. अमोल कोल्हे, लेखक प्रताप गंगावणे, दिग्दर्शक कार्तिक केंद्रे, विवेक देशपांडे, कु. आशा बोडस (छोटी येसूबाई) दिवेश मेदगे (छोटा संभाजी) व इतर कलावंत उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन प्रदीप कांबळे करणार आहेत. दि. 7 रोजी सकाळी 8.30 वाजता विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, प्राचार्य प्रमोदिनी मंडपे उपस्थित राहणार आहेत. सांगता सभारंभ दुपारी 3 ते 5 यावेळेत होणार आहे. यावेळी पत्रकार संजय आवटी, अध्यक्षपदी विनय दर्डीकर, प्रमुख म्हणून जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 7 ते 10 गीत रामायण. दि. 8 रोजी सकाळी 8.30 ते 10.30 कथाकथन, सकाळी 11 ते 1.30 इथे घडतात वाचक वक्ते, दुपारी 3 ते 5 कवी संमेलन होणार आहे. सायंकाळी 5.30 ते 8 कविता करंदीकरांची गाणी पाडगावकरांची कार्यक्रम होईल. ग्रंथमहोत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात आली असून स्टॉलची उभारणी वेगात सुरु आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular