सातारा : सातारा जिल्ह्यघत गेल्या दोन दिवसाच्या उघडीनंतर आज सर्व ठिकानी पाऊस सक्रिय झाला आहे. कोयना धरणात आज 25.66 टीएमसी ऐवढा पाणीसाठा झाला असून कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये 27 मि.मी., नवजा 58 मि.मी. तर महाराष्ट्राच्या चेरापुंजी म्हणून ओळखल्या गेलेल्या महाबळेश्वर येथे सर्वात जास्त 43 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये झाली आहे. पडत असलेल्या पावसामुळे शेतकर्यांच्या पल्लवीत झाल्या आहेत. या पावसामुळे रखडलेली भात शेतीची लागवडीची कामे असाच पाऊस लागून राहिला तर आठवडाभरात पूर्ण होतील असा विश्वासही शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात
RELATED ARTICLES