Sunday, February 16, 2025
Homeसातारा जिल्हाकराडसातारा जिल्ह्याला रेड अलर्ट ; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट ; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सातारा दि. ८ (जि.मा.का.) हवामान विभागाने सातारा जिल्यामध्ये दि. ८ ते ९ जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्याअनुषंगाने

नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे.

दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. व स्वत:हुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.
मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये.
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे.
जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नका.
नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
पर्यटन स्थळे उदा. धबधबे, धरण परिसर, घाटमाथा इत्यादी ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव जाणेचे टाळावे.
पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली आश्रय घेऊ नका, व मोबाईलचा वापर करू नका .
प्रवास करतेवेळी घाट रस्याासत विनाकारण थांबु नये.
अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
०००००

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular