Saturday, May 17, 2025
Homeठळक घडामोडीशंभर फुटी रस्त्याप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांना भेटणार : डॉ. अतुल भोसले

शंभर फुटी रस्त्याप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांना भेटणार : डॉ. अतुल भोसले


कराड : कराडमधील दत्त चौक ते बैलबाजार या मार्गावरील प्रस्तावित 100 फुटी रस्त्यामुळे अनेकजण बाधित होणार आहेत. त्यामुळे हा रस्ता रद्द करावा, या मागणीसाठी शंभर फुटी रस्ताविरोधी संघर्ष कृती समितीच्या सदस्यांसमवेत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले. शंभर फुटी रस्ताविरोधी संघर्ष कृती समितीच्यावतीने कराड येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीच्या प्रारंभी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 30 ऑगस्ट 2014 रोजी शहराच्या दुसर्‍या सुधारित विकास योजनेला अंशत: मंजुरी दिली. मात्र त्यात कोणाचीही मागणी नसताना दत्त चौकातून मार्केट यार्डकडे जाणार्‍या रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी देण्यात आल्यामुळे, भविष्यात हा रस्ता 100 फुटी होणार असल्याने या भागातील अनेक मिळकती बाधित होणार असल्याची भिती व्यक्त केली.त्यानंतर बोलताना भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले म्हणाले, की पर्यायी रस्ते असतानाही विनाकारण शंभर फुटी रस्त्याबाबतचा झालेला निर्णय चुकीचा व अन्यायकारक आहे. या प्रस्तावित रस्त्यामुळे या भागातील 200 हून अधिक मिळकतधारक बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा रस्ता रद्द करण्याबाबत मागणी करणार आहे. त्यामुळे या भागातील मिळकतधारकांनी भिती बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले. 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular