Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडी9 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

9 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

सातारा दि.4 (जि.मा.का.): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या विद्यमाने शनिवार दि. 9 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा न्यायालय, सातारा व तालुकास्तरावरील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील सर्व प्रकारची प्रलंबित पकरणे म्हणजे सर्व दिवाणी व फौजदारी (तडजोडपात्र गुन्हे), भूसंपादन नुकसान भरपाईची प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटस ॲक्ट च्या कलम 138 खाली दाखल झालेली प्रकरणे, महसूल बाबतची प्रकरणे, कामगार वाद, वन कायदा व इतर सर्व तडजोडपात्र प्रकरणे. तसेच वादपूर्व प्रकरणे म्हणजे Bank Recovery disputes (including those which would fall u/s १३८ NI Act), Labour Disputes, Water and Electricity disputes, टेलिफोन, मोबाईल कंपनी थकीत बिले वसुली प्रकरणे इ. प्रकरणांबाबत तडजोड करण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
ज्या पक्षकारांना तडजोड करण्याची इच्छा आहे अशा सर्व पक्षकारांनी आपल्या वकीलांसह तडजोडीसाठी या लोकअदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. एन. लढ्ढा तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती ए. एस. वैरागडे यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular