Sunday, May 18, 2025
Homeठळक घडामोडीमंगल जेधे खून ज्योती मांढरेला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी

मंगल जेधे खून ज्योती मांढरेला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी

वाई : बोगस डॉक्टर संतोष पोळ याला मंगल जेधे खून प्रकरणात तेरा दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली होती. त्याची गुरूवार दि. 25 ऑगस्टला दोंन्ही आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने वाईच्या न्यायालयात सकाळी दहा वाजता हजर केले असता न्यायालयाने संतोष पोळची मंगल जेधे प्रकरणातील एक दिवसाची पोलिस कोठडी शिल्लक असल्याने न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली तर मंगल जेधे खून प्रकरणातच त्याची साथीदार ज्योती मांढरे हिला तिच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने याच प्रकरणात तिला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. ज्योती मांढरे हिला वाई ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. तदनंतर रवानगी केली.  व दोघांनाही शुक्रवारी सकाळी न्यायालयात हजर केले जाणार आहे. मंगल जेधे खून प्रकरणात दोघांच्याही पोलिस कोठडीची मुदत संपली असली तरी ही सलमा शेखसह इतर खूनांच्या तपासासाठी पोलिस दोघांनी जास्तीत-जास्त पोलिस कोठडी घेण्यासाठी प्रयत्नशील राहतील. दरम्यान, ज्योती मांढरे हिच्या सहयाद्रीनगर मधील घरावर पोलिसांनी छापा मारून संपूर्ण घराची तपासणी करून तपासामध्ये महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular