चाफळ आठवडा बाजारामध्ये गोळीबार
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास साळुंखे यांचा दोन गोळ्या लागून मृत्यू
सातारा : तीर्थक्षेत्र चाफळ, ता. पाटण येथे गुरुवारी आठवडा बाजारात बेदरकारपणे जीप चालवणार्या चंद्रकांत भाईगडे (रा. जंगलवाडी (जाधववाडी), ता. पाटण) याला जाब विचारण्याचा प्रयत्न चाफळ येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास बबन साळुंखे (वय 37) यांना जीवावर बेतणारा ठरला. मद्यधुंद अवस्थेत भाईंगडे याने रागाच्या भरात साळुंखे यांच्यावर बंदूकीतून 2 गोळ्या झाडल्याने बाजारपेठेत एकच गोंधळ झाला. गंभीर जखमी झालेल्या साळुंखे यांचा मृत्यू झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाईंगडे याला जमावाने बेदम चोप देवून पोलिसांच्या हवाली केले.
याबाबत पोलिस सूत्रांकडून व घटनास्थळावरुन मिळालेली सविस्तर माहिती अशी की, चाफळ, ता. पाटण येथे रामपेठेत दर गुरुवारी आठवडा बाजार भरत असतो. या आठवडा बाजारासाठी गुरुवारी चाफळ येथे सुमारे 22 गावातील लोक येत असतात. चाफळ बसस्थानक ते श्रीराम मंदिर पायर्यांपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बाजूला घाऊक व किरकोळ व्यापारी आपली दुकाने मांडत असतात. याशिवाय उत्तरमांड नदीच्या पूलाच्या पलिकडेही भाजीपाला व्यावसायिक रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करत असतात. आरोपी चंद्रकांत भाईंगडे हा आज सायंकाळी 4.30 ते 5 वाजण्याच्या सुमारास स्वत:ची कमांडर जीप चाफळ बसस्थानकातून मद्यप्राशन करुन बाजारातून नेहत असताना त्याला चाफळ येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विकास बबन साळुंखे यांनी अटकाव केला होता. यामुळे मद्यधुंद झालेला आरोपी चंद्रकांत भाईंगडे याने कमांडर जीपमध्ये शेतीच्या संरक्षणासाठी घेतलेली डबल बोअरच्या बंदुकीतून विकास साळुंखे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या दोन गोळ्या साळुंखे यांच्या पाठीतून आरपार गेल्या. चाफळ येथील तंटा मुक्ती अध्यक्ष विकास साळुंखे यांचेकडे आठवडी बाजार शुल्क वसुलीचा ठेका आहे, चाफळ आठवडी बाजारात जाधववाडी यांच्याकडे चाफळ येथील दत्ता भाईंगडे हा दारू पिऊन डबलबार बंदूक घेऊन दहशत माजवत होता. यावरून विकास साळुंखे व दत्ता भाईंगडे याचा वाद झाला यावरून माथे फिरू दत्ता भाईंगडे याने विकास यांच्यावर पाठीमागुन गोळीबार केला 2 गोळ्या विकास साळुंखे यांच्या पाठीतून आरपार गेल्याने तो बेशुद्द झाला आरोपी दत्ता भाईंगडे याला ग्रामस्थानी बेदम मारहाण केली व त्याची महिंद्रा कमांडर गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विकास साळुंखे यास तातडीने खाजगी वाहनातून कृष्णा हॉस्पिटलला हलविण्यात आले. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत असलेला आरोपी चंद्रकांत भाईंगडे यांची घटनास्थळावर युवकांनी चांगलीच धुलाई केली. यानंतर आरोपीस कमांडर जीपसह पोलीसांच्या स्वाधीन केले. चाफळ येथील आठवडा बाजारात झालेल्या घटनेची वार्ता सर्वत्र पसरताच उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक घाडगे व त्यांच्या सहकार्यांनी बंदोबस्त वाढवून वातावरण चिघळू दिले नाही. घटनास्थळी जावून पोलिसांनी तातडीने पंचनामा केला. बंदुकीच्या रिकाम्या पुंगळ्या व डबल बोअरची बंदुक ताब्यात घेण्यात आली आहे. व्यापार्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवून घडलेला घटनेचा निषेध व्यक्त केला.