महाबळेश्वर : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी लोकांचा मोठया प्रमाणात सहभाग महत्वाचा आहे. ़ सर्व्हेक्षणात शहरातुन जनतेचा सहभाग वाढावा म्हणुन स्वच्छते बाबत प्रचार व प्रसार करण्यासाठी नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे व त्यांच्या सर्व महीला नगरसेविका यांनी घरोघरी जावुन लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवुन देत आहेत ़ महीलांच्या या अनोख्या मोहीमेचे शहरातुन कौतुक होत आहे.
केंद्र शासनाने घोषित केलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी देशातील नगरपालिकांमध्ये चढाओढ लागली आहे महाबळेश्वर पालिकाही या स्पर्धेत उत्तम कामगिरीच्या जोरावर दररोज रॅकिंग मध्ये वर वर जाताना दिसत आहे राज्यात चंद्रपुर महाबळेश्वर पांचगणी व कराड या पालिकांमध्ये चुरस लागल्याचे दिसत आहे त्या मुळे कधी महाबळेश्वर पुढे तर कधी पांचगणी पुढे अशी स्थिती आहे काल राज्यात महाबळेश्वर क्र 2 होती तर आज पांचगणी क्र दोनवर आहे पहील्या क्रमांकावर चंद्रपुर कायम आहे या तीनही पालिकांच्या रॅकिंग मध्ये फार कमी अंतर राहीले आहे आज चंद्रपुर ही पालिका 16 गुण घेवुन राज्यात प्रथम क्रमांकावर आहे तर पांचगणी 26 गुणांसह दुसरया तर महाबळेश्वर पालिका 27 गणांवर तिसरया क्रमांकावर दिसत आहे या रॅकिंगमध्ये रोज बदल होताना दिसत असुन चांगली रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी महीला नगरसेवकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेतील सर्व महीला नगरसेवकांची एक बैठक पालिकेत पार पडली या बैठकीत सर्व महीला नगरसेवकांनी पक्ष गट तट बाजुला ठेवुन शहराला स्पर्धेत अव्वल येण्याचा बहुमान मिळावा या साठी स्वच्छतेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी घरोघरी जाण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णया नुसार आज नगराध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविकांचा एक गट प्रभाग 1 मधील सर्व घरोघरी जावुन प्रचार करताना दिसत होत्या सर्व पक्षीय महीला गळयात स्वच्छ सर्व्हेक्षणाचे ओळखपत्र हातात माहीती पत्रके व नागरीकांना हात जोडुन स्वच्छते बाबत माहीती देत आहेत लोकही मन लावुन ही माहीती ऐकत आहेत कचरा उघडयावर टाकु नका ओला कचरा व सुका कचरा या बाबत प्रात्यक्षिक दाखवुन कचरा वेगवेगळा जमा करण्याचे आवाहन घरोघरी जावुन महीला नगरसेविका करीत आहेत हात जोडुन महीला नगरसेवकांचा गट घरोघरी जावुन भेट देत असल्याने निवडणुकी प्रमाणे वातावरण दिसत आहे स्वच्छ सर्व्हेक्षण ही स्पर्धा नसुन ती एक जनजागृती कार्यक्रम घरोघरी पोहचविण्याची संधी म्हणुन सर्व महीला नगरसेविका या सर्व्हेक्षणाकडे पहात आहेत. नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे , उपनगराध्यक्ष अफजल सुतार , मुुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या सह सर्व नगरसेवक सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी हे या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असल्याने या सर्वांच्या मदतीला आता पालिकेतील महीला नगरसेविका रस्त्यावर उतरून सर्व्हेक्षणा बाबत जनजागृती करीत असल्याने आता महाबळेश्वर पालिकेेला स्पर्धेत अव्वल येण्यापासुन कोणी रोखु शकत नाही असा विश्वास नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी व्यक्त केला.
महाबळेश्वरमध्ये स्वच्छतेच्या प्रचारासाठी नगराध्यक्षा घरोघरी
RELATED ARTICLES