सातारा : सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या व महाराष्ट शासनाने राज्यपाल यांचे हस्ते राज्यात आदर्श पतसंस्था म्हणून सहकार भ्ाूषण पुरस्कार देवून गौरविलेल्या सातारा जिल्हयातील धन्वंतरी पतसंस्थेने सभासद, ठेवीदार, ग्राहक यांचेकरीता तयार केलेल्या सन 2018 च्या आकर्षक दिनदर्शिकेचे प्रकाशन पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले. दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक-चेअरमन डॉ. रविंद्र भोसले म्हणाले की, सभासदांचे व ग्राहकांना उपयुक्त अशी माहीती जाहिरात रुपाने समाविष्ट करण्यात आली आहे.
आपल्या महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती यानुसार सदर दिनदर्शिकेत माहिती सामाविष्ट करुन ती जपण्याचा प्रयत्न केला आहे. सदर दिनदर्शिकेत आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारे सर्व दिनांचीही माहिती उपलब्ध आहे. सदर दिनदर्शिका संस्थेच्या सहा शाखांमधून सर्व सभासदांना, ग्राहकांना वाटपाकरीता उपलब्ध करण्यात आली आहे. तरी सभासदांना व ग्राहकांना नम्र विनंती की, त्यांनी संस्थेच्या सातारा, कोरेगांव, फलटण, कराड, तसेच पुणे येथील पिंपरी-चिंचवड व धनकवडी शाखेतून दिनदर्शिका घेवून जावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी धन्वंतरी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे म्हणाले की, संस्थेने सामाजीक बांधीलकी बरोबरच गेली 28 वर्षे सहकार खात्याच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन गुणात्मक व संख्यात्मक वाढ करुन सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार यांनी केले.
या प्रसंगी संचालक डॉ. क.श्री. लाहोटी, डॉ. शिरीष भोईटे, डॉ. अरविंद काळे, डॉ. शकील अत्तार, डॉ. सुनिल कोडगुले, डॉ. कैलास खडतरे, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. राजेंद्र सरगर, डॉ.राजेंद्र जाधव, डॉ. सौ. सारीका मस्कर, सुर्यकांत देशमुख व डॉ. अभिजीत भोसले तसेच सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
धन्वंतरी पतसंस्थेचे सन 2018 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
RELATED ARTICLES