मराठा लाईट इंन्फंट्रीच्या लेफ्टनंट टीमची कराडला भेट

कराड: मराठा लाईट इंन्फट्रीच्या विविध बटालियनच्या 8 जांबाज सैनिक अधिकार्‍यांची टीम कराड येथील विजय दिवस समारोह समितीच्या कार्यालयात आली. या ठिकाणी कै. दिग्वीजय जाधव, दीलीप पाटील, चंद्रकांत जाधव तथा विजय दिवस समारोह समितीचे सह-सचिव विलासराव जाधव तथा मोहिते यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर विजय चौकातील विजय स्तंभास भेट देवुन त्यंानी शहीदाना पुष्पार्पण करूण अभिवादन केले. तिथुन पुढे प्रितीसंगमावर जावून त्यंानी भारताचे माजी संरक्षण मंत्री, तथा उपपंतप्रधान स्व.यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळास भेट देवुन पुष्पार्पण करत अभिवादन केले.
कराडची सामाजिक सांस्कृतीक राजकीय तथा ऐतिहासिक बाब पाहुन त्यांनी समाधान व्यक्त करत संधी मिळाली तर आम्ही परतही भेट देण्याचा प्रयत्न करू अशी भावना व्यक्त केली.
या प्रसंगी लेफ्टनंट-वरूण शर्मा, कनिष्क त्यागी मिरज बेल्लीअप्पा, गोकूळ प्रदीप, करमवीर सींग, गोपाल कृष्णन एस.पी.एस्.एस्.प्रज्वल, अमनप्रित सिंग अशा आठ लॅटनंट अधिकार्‍यांंचा तसेच एक जे.सी.ओ. तथा एक एन.सी. ओ. अशा दहा जणांचा समावेश होता.
तिथुन परतल्यावर विजय दिवस समारोह समिती तर्फे दिलेला आल्पोहार घेवून त्यांनी कोल्हापुरला कूच केली.