सातारा: निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांनी सातारा शहरातील नगरपालीका शाळा क्र.23 गाडोली येथील मतदान केंद्र क्र. 283,284, 285, 286, 287 व 287 अ या केंद्रांची पाहणी केली.
यावेळी श्री. झा यांनी मतदारांना आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधांची पाहणी करुन मतदारांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केल्या. तसेच दिव्यांग व अपंग मतदारांना येण्यासाठी रॅम्प असल्याची खात्री केली. मतदान चिठ्ठी व नवीन मतदार ओळखपत्र वाटपाविषयी प्रत्येक बीएलओ चा आढावा घेऊन 100 टक्के वाटप पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या.
भवानी विद्यामंदिर, गुरुवार पेठ, सातारा येथील मतदान केंद्र क्र. 335, 336, 337 यांची पहाणी केली. तसेच प्राथमिक शाळा, मल्हारपेठ, सातारा येथील मतदान केंद्र 333, 334, 334 अ, 313 इत्यादी केंद्रांची पहाणी केली. त्यानंतर कन्या शाळा, सातारा येथील केंद्र क्र. 331 व 332 पहाणी केली. तसेच आयटीआय करंजेतर्फ येथील मतदान केंद्र क्र.238, 239, 239 अ, 240, 241, 242, 243 या संवेदनशील केंद्रांची पहाणी केली. या मतदान केंद्रांची वेब कास्टींग होणार आहे. त्यासाठी बसविण्यात आलेल्या कॅमेर्यांची पहाणी श्री. झा यांनी केली.
सुरेंद्र झा यांनी सातारा शहरातील मतदान केंद्रांची केली पहाणी
RELATED ARTICLES