मल्हारपेठ : मेंढोशी येथे अंधश्रद्धा निर्मूलन जन जागृती समाज प्रबोधन कार्यक्रम उत्साहातसंपन्न झाला डॉ बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विकास मंडळ वीरमाता जिजाऊ महिला मंडळ व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला यामध्ये अंधश्रद्धा ची दुनिया चमत्काराची किमया जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती व गाणी समाजप्रबोधनाची असा बहारदार कार्यक्रम झाला महाराष्ट्र अनिस चे राज्य प्रदान सचिव प्रशांत पोतदार राज्य सहसचिव भगवान रणदिवे मल्हारपेठ शाखा कार्याध्यक्ष दादासाहेब पवार व कार्यकर्ते सुनील रणदिवे वीर पोतदार व प्रतीक पवार यांच्या पथकाने हा जनजागृती समाजप्रबोधन कार्यक्रम सादर केला ग्रामीण भागातील विविध अंधश्रद्धा चे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध सामाजिक संस्था व समाजातील महिला पुरुष युवक युवती व विध्यार्थी वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे कोणत्याही चमत्कारावर पटकन विश्वास न ठेवता त्या चमत्कराची चिकित्सा केली पाहिजे व भांडाफोड करून होणारे नुकसान टाळले पाहिजे असे प्रतिपादन प्रशांत पोतदार यांनी केले शासनाच्या जादूटोणा विरोधी व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची परिपूर्ण अंमल बजावणी करण्यासाठी सर्वानीच प्रयत्न शील व कृतिशील राहिले पाहिजे असे भगवान रणदिवे यांनी सांगितले संतांची भूमिका व समाजसुधारकांची सामाजिक कार्य तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातील परखड भूमिका व विचार याविषयीची सविस्तर माहिती दादासाहेब पवार यांनी दिली यावेळी पाचशे टोकदार खिळ्यांच्या पाटावर झोपणे जळता पलिता अंगावर फिरवणे पेटता कापूर खाणे लंगर तोडणे जिभेतून तार आरपार काढणे भूत भानामती करणी अंगात येणे झपाटने यावर आधारित विविध चमत्कार सादरीकरण ही करणेत आले सर्व प्रकारच्या चमत्कारामागील विज्ञान व हातचलाखी याबद्दलही माहिती देणेत आली मनोरंजनातून समाजप्रबोधन पर कार्यक्रम झाला तसेच गाणी समाज प्रबोधनाची हाही कार्यक्रम झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विकास मंडळ वीरमाता जिजाऊ महिला मंडळ यांचे बहुमोल सहकार्य मिळाले सिध्दार्थ सत्वधीर नामदेव कंठे तानाजी सत्वधीर सिद्धार्थ कंठे जगन्नाथ सत्व धीर सोनाबाई कंठे सविता सत्व धीर आदी मान्यवर उपस्थित होते या समाजप्रबोधन कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मेंढोशी येथे अंधश्रद्धा निर्मूलन समाजप्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
RELATED ARTICLES