सातारा ः सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ते गावोगावी आणि घरोघरी पोहचून मतदारांपर्यंत आपल्या उमेदवारीची भुमिका पटवून देत आहेत. या मतदारसंघात सुमारे 1 लाख नवमतदार असून त्यापैकी बहुतेक तरुण टेकसॅव्ही आहेत. त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहचून आपल्या उमेदवारीची आणि प्रचाराची माहिती देण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या टीमने नरेनअॅप नावाचे अँड्रॉईड अॅप तयार केले आहे. अगदी लहान आकाराचे हे अॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करुन कोणालाही नरेंद्र पाटील यांच्या कव्हरेजमध्ये चोवीस तास राहता येईल.
आता निवडणुकीसाठी काही दिवसच शिल्लक असल्यामुळे नरेंद्र पाटील तसेच त्यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसह अवघा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तरीही हा मतदारसंघ प्रचंड विस्तीर्ण असल्यामुळे प्रत्येकापर्यंत पोहोचणे शक्य नाही. यासाठी प्रामुख्याने तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेउन नरेंद्र पाटील यांच्या टीमने नरेनअॅप अँड्रॉईड अॅप तयार केले आहे. केवळ 4 एमबी एवढ्या आकाराचे हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
नरेनअॅप प्लेस्टोअरवरुन डाउनलोड करुन आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर सर्वप्रथम युजरला त्यावर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले जाते. रजिस्ट्रेशन पेजवर आपले नाव, पासवर्ड आणि मोबाईल क्रमांक एंटर केल्यानंतर आपण नरेनअॅपचे अधिकृत युजर बनतो. त्यानंतर अॅप लाँच करतोच आपण थेट अॅपच्या होम पेजवर पोहचतो. होम पेजवर नरेंद्र पाटील यांच्या प्रचाराविषयीच्या प्रमुख बातम्या, आजच्या दिवसाचे प्रचार नियोजनच्या लिंक्स देण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीचा वचननामादेखील सविस्तरपणे पहायला मिळतो. ही सर्व माहिती अधिकृत असल्यामुळे त्याबाबत पुन्हा खातरजमा करण्याची गरज राहत नाही.
होम पेजच्या खालील बाजूस नेतृत्व, कार्यक्रम, निवडणूक आदी लिंक्स पाहता येतात. नेतृत्व लिंक अंतर्गत नरेंद्र पाटील यांच्यासह माथाडींचे आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याविषयी सविस्तर माहिती मिळवता येते. निवडणूक या लिंक अंतर्गत मतदारयादीत आपले नाव शोधता येते.
नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून सातारा लोकसभा मतदारसंघाला प्रथमच तंत्रज्ञानाची माहिती असणारा उमेदवार लाभला आहे.
मोबाईल अॅपच्या माध्यमातून नरेंद्र पाटील यांनी आपला मतदारांपर्यंतचा अॅक्सेस आणखी विस्तीर्ण केला आहे. या अॅपला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ते हजारो लोकांनी डाउनलोड केले आहे.
मोबाईल अॅपमधून नरेंद्र पाटील चोवीस तास कव्हरेजमध्ये
RELATED ARTICLES