Sunday, January 25, 2026
Homeताज्या घडामोडीकराड दक्षिणमध्ये उदयनराजेंचा झंझावाती प्रचार दौरा

कराड दक्षिणमध्ये उदयनराजेंचा झंझावाती प्रचार दौरा

कराड : फटाक्यांची आतिषबाजी करत गावागावांत आणि वाडीवस्त्यांवर खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. लोकशाहीतील या राजांनी आपल्या लाडक्या जाणत्या राजाला विक्रमी मताधिक्याने लोकसभेत पाठवून हॅटट्रिक साधण्याचा निर्धार व्यक्त केला.
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले कराड दक्षिणच्या संपर्क दौर्‍यावर होते. या वेळी अ‍ॅड. राजाभाऊ पाटील उंडळकर, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराडचे नगरसेवक राजेंद्र यादव, बंडानाना जगताप आदी त्यांच्या सोबत उपस्थित होते.
तालुक्यातील कोयना वसाहत, जखीणवाडी, नांदलापूर, काले टेक, काले, धोंडेवाडी, विंग, येरवळे, पोतले, येणपे, किरपे, आणे, कोळे तारूख, कुसुर, कोळेवाडी, धारेवाडी, चचेगाव या गावांना खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी भेटी देऊन जमलेल्या लोकांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी शिंग-तुतार्‍यांच्या निनादात, फटाक्यांची अतिशबाजी करत उदयनराजेंचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. महिलांनी रस्त्यांवर रांगोळ्या घातल्या होत्या. सुवासिनींनी औक्षण करुन स्वागत केले. व विजयी व्हा असे शुभाशीर्वाद दिले.
यावेळी बोलताना श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले जनता ही लोकशाहीतील राजे आहे. या राजांनीच सत्ताधार्‍यांना निवडून दिले. जनतेमुळे आज ते सत्तेवर आहेत. त्यांच्या मुळे जनता नाही, हे कोणीही विसरून चालणार नाही. त्यांना केवळ मत हवं होतं; लोकांच्या वैचारिक मताची त्यांना किंमत नाही. तरुणांना बेरोजगार करून यांनी भावी पिढी बरबाद करण्याचं पाप केलं. आजचा तरुण दुर्दैवाने व्यसनाधीन झाला, वाममार्गाला लागला. नैराश्याने ग्रासलेल्या तरुनांनी आत्महत्या करण्यापेक्षा व्यसनाला सोबती बनवलं ही आजची शोकांतिका आहे.
5 वर्षे काहीही न करणार्‍या शासनाला आता पाणी पाजा. राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागांवर राष्ट्रवादी व काँग्रेस विचारांचे उमेदवार निवडून द्या. मग पहिल्या सरकारमधील चुकीचे व जाचक निर्णय आपण बदलायला लावू, असे आवाहनही श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
या दौक्षफयात जि.प. सदस्या मंगलाताई गलांडे, शंकर खबाले, नंदाताई यादव, उत्तमराव पाटील, सुभाष पाटील, सयाजी यादव, सर्जेराव लोकरे, विलासराव यादव, निवासराव शिंदे, दत्ता पाटील, नारायण पाटील, लक्ष्मण देसाई, राजेंद्र चव्हाण, दत्ता गुरव, भिमराव पाटील, वसंतराव भोसले, माधव नांगरे-पाटील, तानाजीराव पाटील, आबासाहेब खबाले, अनिल माळी, आदिकराव गरुड, संतोष ढेरे तसेच ठिकठिकाणचे सरपंच, आजी-माजी पं.स. सदस्य, सोसायट्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.े

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular