परळी : उन्हाळ्यात सातारचे तापमान इतर शहरांच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे घरासह हॉटेल, दुकान व इतर ठिकाणे थंड ठेवण्यासाठी सातारकर विविध उपाययोजना करत असतात. छतावर हिरव्या जाळ्या (ग्रीन नेट) लावून घर थंड करण्याला नागरिक प्राधान्य देतात. त्यामुळे बाजारात नेटची मागणी वाढली असून चार महिन्यात कोट्यवधींची उलाढाल झाली आहे.
उन्हाळ्यात शहराचे तापमान अधिक असते. उन्हाळ्यात तापमान अनेकदा चाळीसी पार गेल्याची नोंद आहे. अशात शहरात सिमेंटचे रस्ते त्यामुळे घरात देखील उष्मा कमी करण्यासाठी ग्रीन नेट लावण्याची मागणी वाढली आहे. सातारा शहरात व उपनगरांतील राजवाडा, शाहूपुरी, रविवार पेठ, पोवई नाका येथे दररोज नागरिकांची मोठी गर्दी नेट खरेदी करण्यासाठी होत आहे. दोन ते तीन प्रकारात ही नेट बाजारात उपलब्ध असून जवळपास 50 ते 80 टक्के उष्णता कमी करण्याची क्षमता या नेटमध्ये आहे.
घराच्या छतावर पडणारे थेट उन आणि त्यामुळे घरात होणारी उष्णता कमी चे करण्यासाठी तसेच फ्लॅटच्या गॅलरीतून थेट घरात येणा-या उन्हापासून बचावासाठी नागरिक या नेटचा आधार घेत आहेत. ग्रीन नेट जाळी 50 ते 120 रूपये फुट असे नेटचे दर आहेत. उष्णता कमी करण्याच्या क्षमतेप्रमाणे दर ठरवण्यात आले आहेत.
कडक उन्हामुळे ग्रीन नेटची मागणी वाढली
RELATED ARTICLES