धोम-बलकवडी धरणाच्या पाण्यात झपाट्याने वाढ

धोम धरण 35 टक्के तर बलकवडी धरण 65 टक्क्यापेक्षा जास्त भरले
वाई : दोन आठवड्याच्या विश्रांती नंतर पुन्हा गेली दोन दिवसांपासून तालुक्यात विशेषतः पश्चिम भागात दिवरात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. बलकवडी पाणलोट क्षेत्रात ही लगातार धो- धो पाऊस पडत असून धरणाची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत बलकवडी धरण 65 टक्के भरले आहे, पाऊसाचा जोर असाच राहिला तर धरण पूर्ण क्षमतेने भरेल असं धरण वेवस्थापणानाने सांगितले, धोम धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडत आहे, धरण 35 टक्के भरले आहे. भात लागणही अंतिम टप्प्यात आली आहे. वाई शहर- परिसरासह तालुक्याच्या पूर्व भागालाही पाऊसने अक्षरशः झोडपून काढले आहे, कृष्णा नदीला पूर आला असून वाईतील लहान पूल शुक्रवारी रात्री पाण्याखाली गेला होता.
दोन आठवड्यापूर्वी झालेल्या मुसळधार पाऊसने बळीराजा सुखावला होता, ओढे- नाले तुडुंब भरून वाहायला सुरुवात झाली होती, तळ गाठलेल्या विहिरीची पाणी पातळी वाढली, धोम व बलकवडी धरणाच्या पाणी साठयातही कमालीची वाढ झाली. पश्चिम भागातील जलत्रोत वाढल्याने येथील शेतकरी वर्ग भात लावणीत मग्न झालं होता. पूर्व भागात ही पेरणीला वेग आला होता.
मात्र अचानक दोन आठवडे पाऊस गायब झाल्याने उर्वरित भात लागणीची कामे रखडली होती, पूर्व भागात ही 70टक्के पेरण्या झाला होत्या, पाऊसने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र गेली दोन- तीन दिवसांपासून पुन्हा पाऊसचे जोरदार आगमन झाल्याने हा पाऊस पिकासाठी उपयुक्त मानला जात आहे.
धोम व बलकवडी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. डोंगर- कपारीतून कोसळणार्‍या धबधब्यामूळे ओढ्याना पूर आला आहे. अनेक ठिकाणी पाणी शेतात घुसल्याच्या घटना घडल्या आहेत.संपूर्ण पश्चिमभाग जलमय झाला असून भात खंचरे पाण्याखाली गेली आहेत. दूरध्वनी यंत्रणाही कोलमफली असून अनेक गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुपारी चार वाजेपर्यंत बलकवडी धरण 65 टक्के भरले होते, तर धोम धरण 35 टक्क्यांपर्यंत पोहचले होते.
वाई शहर व परिसरालाही पाऊसने अक्षरशः झोडपून काढले आहे. दिवरात्र धो-धो कोसळणार्‍या पाऊसने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिसरातील ओढ्याना पूर आला आहे, शहरातील गटारे तुडूंब भरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. पाऊसाचा बाजपेठेवर परिणाम झाला आहे, मंडई ओस पडली आहे. गुरुवार- शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने कृष्णा नदीला पूर आलाअसून रात्रीपासून लहानपुलावरून पाणी वहात होते. पुरात वाहून आलेला महाकाय ओंडका पुलाजवळ अडकून पडला आहे. लहान मंदिरे पाण्याखाली गेली होती. अनेक तरुण पुरात पोहण्याचा आनंद लुटत होती.
सिद्धनाथवाडी, दत्तनगर परिसरातील वीजपुरवठा आठ तास खंडित……….
मुसळधार पाऊसने दत्तनगर येथे असलेल्या म डीपी म त तांत्रिक बिगड झाल्याने शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून सिद्धनाथवाडी, दत्तनगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले, महावितरणकडे सर्व यंत्रणा सज्ज असतानाही म डीपी म तील बिगड ते दुरुस्त करू न शकल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.