फलटणः न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर कारखान्याने गेल्या 85 वर्षाच्या इतिहासात अनेक चढउतार पार केले असल्याचे नमूद करीत विद्यमान चेअरमन प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांच्या धाडसी नेतृत्वाखाली गेल्या 10/12 वर्षापासून सुरु असलेला या कारखान्याचा कारभार उस उत्पादक शेतकरी, कामगार आणि परिसराला न्याय देणारा आहे. आगामी काळात या कारखान्याला उज्वल भवितव्य असल्याचे प्रतिपादन सदगुरु सेवागिरी देवस्थान पुसेगांवचे मठाधिपती प. पू. सुंदरगिरी महाराज यांनी केले आहे.
न्यू फलटण शुगर वर्क्स लि., साखरवाडी ता. फलटण या साखर कारखान्याच्या सन 2017 – 18 मधील गळीत हंगामाचा शुभारंभ, मोळीपूजन व गव्हाण पूजनाने विधीवत प. पू. सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक प्रल्हादराव साळुंखे (पाटील), शामराव भोसले, साखर व्यापारी संजयशेठ रायसोनी, मदनशेठ करवा, तानाजीराव गायकवाड, हिरालाल पवार, धनंजय साळुंखे (पाटील), सुरवडीचे सरपंच जितेंद्र साळुंखे (पाटील), उस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कार्यालय अधिक्षक सुधीर सहस्त्रबुध्दे व अन्य अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुटुंबप्रमुख या नात्याने प्रल्हादराव सक्षम आजच्या परिस्थितीत स्वत:चा संसार करताना आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर साखर कारखाना हा हजारोंचा संसार असून तो चालविताना कुटुंबप्रमुख या नात्याने प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांना नित्य नव्या अडचणींचा, आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे मात्र सवार्ंचा योग्य समन्वय, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि परमेश्वराचा आधार याच्या माध्यमातून प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी गेल्या 10/12 वर्षात अनंत अडचणीवर मात करुन हा कारखाना उर्जितावस्थेला आणतानाच कारखान्याची गाळप क्षमता 1250 मे. टन प्रति दिन वरुन सुमारे 3500 ते 4000 मे. टन प्रति दिनपयर्ंत वाढविण्यात यश प्राप्त केले आहे. आगामी काळात न्यु फलटण शुगर वर्क्स हा कारखाना कर्जमुक्त होवून उस उत्पादक शेतकरी, कामगार व परिसराच्या विकासाचे केंद्र म्हणून आघाडीवर राहिल याची ग्वाही देत प. पू. सुंदरगिरी महाराज यांनी आपले आशिर्वाद या कारखाना आणि प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.
कारखाना लवकरच कर्जमुक्त होईल आज केंद्र व राज्य सरकारही कर्जबाजारी आहे, मोठमोठ्या कारखान्यांकडे कोट्यावधीची कर्ज आहेत अशा परिस्थितीत न्यू फलटण शुगर वर्क्स प्रगतीच्या दिशेने झेपावत असताना, 85 वर्षाच्या जुन्या मशिनरीत अमूलाग्र बदल करण्याबरोबरच नव्याने अर्कशाळेची उभारणी होत असताना कर्ज झाले म्हणून भिण्याचे कारण नाही. आगामी काळात हा कारखाना कर्जमुक्त होवून उत्तम चालणार असल्याने या कारखान्याला उस उत्पादक शेतकरी, कामगार व अन्य घटकांनी योग्य ती मदत व सहकार्य करण्याचे आवाहन प. पू. सुंदरगिरी महाराज यांनी केले.
10/12 वर्षात आर्थिक सुधारणा झाल्या सुमारे 12 वर्षापूर्वी 105 कोटीचे कर्ज डोक्यावर घेवून 75 वर्षाची जुनी मशिनरी आणि केवळ 1250 मे. टन गाळप क्षमतेचा हा कारखाना बंद पडल्यानंतर परिसरातील उस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या समस्यांचा विचार करुन आपण मोठ्या धाडसाने हा कारखाना सुरु करण्याचा निर्धार केला त्याला उस उत्पादक शेतकरी, कामगार व अन्य घटकांनी केलेल्या मदतीमुळेच आपण गेल्या 10/12 वर्षात या कारखान्याच्या परिस्थितीत बदल करुन गाळप क्षमता वाढ, जुन्या मशिनरीऐवजी नवीन मशिनरी उभी करुन कारखाना सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर या क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे अन्य कारखान्यांप्रमाणे उपपदार्थ निर्मिती, शासनाच्या सवलती, बँकांची कर्जे आदी सुविधा उपलब्ध नसतानाही केवळ साखर निर्मितीतून अन्य कारखान्यांइतकाच उसाला दर आणि कामगारांना वेळेवर व नियमानुसारपेमेंट करण्यात यशस्वी झालो कदाचित अन्य कारखान्याच्या तुलनेत प्रति टन 50 ते 75 रुपये कमी द्यावे लागले असले
तरी हा कारखाना बंद पडला असता तर येथील उस उत्पादकांना वाली राहिला नसता परिणामी प्रचंड कमी दरात उस द्यावा लागला असता त्याचबरोबर कामगारांची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली असती ते टाळण्यात आपण गेल्या 10/12 वर्षातयशस्वी झालो आहोत आगामी काळात परिसरातील कारखान्यांइतकाच दर देण्याची ग्वाही देत केवळ 2 वर्षे सहकार्य करण्याचे आवाहन प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी यावेळी केले.
कारखान्याची आर्थिक स्थिती विचारात घेवून त्याचबरोबर गेल्या 2 वर्षात साखरेच्या दरात झालेल्या प्रचंड घसरणीमुळे परिसरातील कारखान्यांइतका दर देण्यात अनंत अडचणी होत्या, या अडचणी अन्य कारखान्यांसमोरही होत्या मात्र उपपदार्थ निर्मिती प्रकल्पामुळे अन्य कारखाने त्यातून मार्ग काढू शकले.
आपल्याकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने मोठे संकट होते मात्र त्यावर मात करुन आपण गेल्या 2 वर्षात उस उत्पादकांना वेळेवर पेमेंट आणि परिसरातील कारखान्यांइतका दर देण्यात यशस्वी झाल्याचे नमूद करीत आगामी 2 वर्षानंतर अर्कशाळा सुरु झाल्याने कारखाना कोणत्याही परिस्थितीत परिसरातील कारखान्यांइतकाच किंबहुना अधिक दर देण्यासाठी प्रयत्नशील राहील याची ग्वाही देत आगामी 2 वर्षासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी केले. श्रीराम व साखरवाडी ही श्रध्दास्थानेन्यू फलटण शुगर आणि श्रीराम साखर कारखाना ही या तालुक्यातील श्रध्दास्थाने आहेत, त्यांनी या तालुक्याची
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी घेतलेली मेहनत प्रेरणादायी असून त्यांना उस उत्पादक शेतकरी, कामगार व अन्य घटकांनी केलेली मदतही तितकीच उपयुक्त ठरल्याचे नमूद करीत आगामी काळात हे दोन्ही कारखाने पूर्ववैभवाप्रत जात असून तालुक्याच्या विकासाची नवी केंद्रे म्हणून ती निश्चितच कार्यरत राहतील याची ग्वाही प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी स्पष्ट शब्दात दिली.
प्रारंभी कामगार युनियनचे पोपटराव भोसले यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात कारखान्याची सद्यस्थिती, गेल्या 10/12 वर्षात झालेली प्रगती त्यासाठी शेतकरी व कामगारांचे लाभलेले योगदान याविषयी सविस्तर विवेचन करुन प. पू. सुंदरगिरी महाराज यांचा प्रत्यक्ष आशिर्वाद आजच्या कार्यक्रमामुळे लाभला असल्याने आगामी काळात कारखाना प्रगतीच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचेल असा विश्घ्वास व्यक्त केला.
धनंजय साळुंखे (पाटील) यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर कारखान्याचे भवितव्य उज्ज्वलः प.पू.सुंदरगिरी महाराज
RELATED ARTICLES