सातारा : सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांची सातार्यात चौथ्या शनिवारच्या मुहुर्तावर डिनर डिप्लोमसी चांगलीच रंगली जिल्हाधिकारी कार्यालयातून मंत्रालयात पदोन्नती वर गेलेल्या एका अधिकार्याच्या उपस्थितीने पालिका वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. या प्रकरणात बांधकाम विभागाने पुढाकार घेतल्याची खाजगीत खसखस रंगली. पालिकेला अडचणीत आणणार्या जनहित याचिकांची रांग सुरु झाल्याने तत्काळ भोजनावळीचा पर्याय काढून सुवर्णमध्य शोधण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची जोरदार चर्चा आहे.
सातारा पालिकेत सातारा विकास आघाडीचा कारभार गेल्या दहा महिन्यापासून सुरू आहे मात्र आघाडीच्या कारभार्यांची चार दिशेला चार तोंडे असल्याने एकमेकांची जिरवायची कशी याचेच आडाखे बांधले जात आहेत त्यामुळे पालिका मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनी आरोग्यपूर्ण संगनमत करून आपल्या शासकीय व खाजगी कामाचे वेगळेच तंत्र शोधून काढले आहे मध्यंतरीच्या काळात जिल्हा प्रकल्प संचालक किरण राज यादव यांची मुंबईत उपायुक्त म्हणून पदोन्नती वर बदली झाल्याने प्रभारी सूत्रे गोरे साहेबांना सोपवण्यात आली होती त्यावेळी गोरेंनी प्रशासन अधिकार्यांकडे पालिका सोपवून पुण्या मुंबईला पळं काढण्याचे धोरण ठेवले होते.
मात्र दोन दिवसा पूर्वी पालिके जवळच्या एका हॉटेलमध्ये मुख्याधिकार्यांची रंगलेली डिनर डिप्लोमसी चांगलीच चर्चेत आली आहे या जेवणावळीला मुंबई महापालिकेच्या बडया अधिकार्याला आवतण धाडण्यात आले होते. जेवणावळीच्या निमित्ताने निवांत चर्चा व्हावी म्हणून क्षुधा शांतीचा घाट घालण्यात आला होता याला पालिकेचे मोजकेच कर्मचारी उपस्थित होते सुमारे दीड तास गोरेंची डिनर डिप्लोमसी रंगली मात्र चर्चेचा तपशील जाणीवपूर्वक गुलदस्त्यात ठेवण्यात आला. मार्गदर्शनाच्या नावाखाली सवलत मागण्याचा प्रकार होता अशी माहिती समोर येत आहे.
मात्र पालिकेतील 60 सफाई कर्मचार्यांच्या भरती प्रकरणात डीएमए ऑफिसची चार स्मरणं पत्रे येउनही गोरे साहेबांनी कायदेशीर हालचाल केली नाही शिवाय कंत्राटी इंजिनिअरच्या विरोधात कायदेशीर प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने पालिकेच्या अडचणी प्रचंड वाढणार आहेत. याशिवाय कराड मलकापूर वाई महाबळेश्वर पालिकांमध्ये ज्या वादग्रस्त प्रकरणावर जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी झाल्या त्याचे निर्णय अद्याप बाकी आहेत तसेच सातारा पालिकेच्या 36 कर्मचार्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. या प्रकरणांवर तोडगा काढण्याच्या हालचाली सुरु आहेत म्हणूनच गोरेंनी डिनर डिप्लोमसीचा घाटं घातल्याचे बोलले जात आहे.