साताराः ग्रामपंचायत हा गावाच्या विकासाचा कणा आहे. सरपंच आणि सदस्यांनी एकदिलाने काम करुन ग्रामपंचायतीचा कारभार लोकाभिमुख कसा होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी विकासकामांच्या माध्यमातून आपल्या गावाचा कायापालट करावा आणि ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
बेंडवाडी ता. सातारा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत आ. शिवेंद्रसिंहराजे गटाच्या जानाईदेवी विकास आघाडीच्या पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित करुन सत्ता काबीज केली. पॅनेलचे सातही सदस्य बिनविरोध निवडून आले तर, सरपंचपदासाठी झालेल्या निवडणूकीत पॅनेलचे उमेदवार सर्जेराव गावडे विजयी झाले. नवनिर्वाचित सरपंच सर्जेराव गावडे आणि सदस्य रमेश गावडे, प्रकाश माने, भरत खोत, सौ. पुष्पा अवकिरे, सौ. संगिता माने, सौ. सुमन गावडे, कु. डॉ. मिना खोत यांचा सत्कार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी पॅनेलप्रमुख गंगाराम अवकिरे यांच्यासह किसन गोरे, काशिनाथ कोकरे, अजय कोकरे, पांडूरंग गावडे, सुनिल माने, विनायक माने, विश्वास माने, श्रीरंग गावडे, जानू झोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामस्थांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला निवडूण दिले आहे. सदस्य तर बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे तुमच्यामाध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी प्रयत्न करा. निवडणूकीपुरते राजकारण झाले आता गटतट बाजूला ठेवून एकजुटीने गावातील समस्या सोडवल्या पाहिजेत. ग्रामस्थांना विचारात घेवून ग्रामपंचायतीचा कारभार करा.
एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन गावाचा सर्वांगिण विकास साधा.
विकासकामांसाठी एक आमदार म्हणून माझे नेहमीच सर्वातोपरी सहकार्य राहील, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सांगितले.
विकासकामांच्या माध्यमातून ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवाः आ. शिवेंद्रसिंहराजे ; बेंडवाडी ग्रामपंचायतीवर आमदार गटाचे निर्विवाद वर्चस्व
RELATED ARTICLES