सातारा (अतुल देशपांडे यांजकडून) : मागीलवर्षी सातारा हिल मॅरेथॉनचे नाव गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. यावर्षी अतिशय सुरेख प्रतिसाद देत आज या पाचव्यांदा संपंन्न झालेल्या स्पेर्धेत पाच हजाराहून अधिक लोक धावत या सवांनी हिल मॅरेथॉनचा आनंद उठवला. सातार्यात देश परदेशातील 5000 लोकांनी 21 किलोमीटरसाठी धाव घेतली.
पीएनबी मेटालाईफ कंपनीतर्फे प्रायोजित करण्यात आलेल्या या पाचव्या सातारा हिल मॅरेथॉनसाठी एकूण साडें पाच हजाराहून स्पर्धक धावत होते. सातारच्या पोलीस कवायत मैदानापासून ही धाव सुरू होवून कास रस्त्यावरील यवतेश्वरच्या परिसरातील घाटमाथ्यावरून हे स्पर्धक पुन्हा परत पोलीस मैदानावर परतले व या सर्वांनी 21 किलोमीटरची ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत इथिओपियाच्या बिरुक जिफार खेळाडूने 1 तास 9 मिनीट 22 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करून दीड लाखांचे रोख बक्षिस तसेच स्मृतिचिन्ह प्राप्त केले. दुसरा क्रमांक डिनीयास कुमसाने 1 तास 10मिनीट 40 सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. तर अडिसू अबेबे याने 1 तास 12 मिनीट 47 सेंकंदात तिसरा क्रमांक मिळविला.महिला गटात इथोपियाच्याच मेसिराक सेमेने 1 तास 24 मिनिट 08 सेकंदात स्पर्धा पार करत पहिला क्रमांकमिळवला. तर दुसरा क्रमांक 1 तास 24मिनिट 22 सेकंदात नोंदवित बान्टू मेगेरसाने मिळविला. तिसरा क्रमांक मिसा मोहंमद ने 1 तास 24 मि. 59 सेकंदात ही स्पर्धा पार करून मिळवला.
सातारचे खा. श्री.छ. उदयनराजे भोसले व धावपटू ललीता बाबर , पीएनबीचे अधिकारी अभिषेक यांनी झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरूवात केली. या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून नॉरीव्हिल्यमसन स्पर्धा प्रसंगी हजर होते.सकाळी 6 वाजता ही स्पर्धा सरु झाली व त्यानंतर आठचे सुमारास बेटी कोई बाझ नही ही साडेतीन किमीु अंतराची फन रन संपन्न झाली. इथिओपिया, फिनलँड, जर्मनी, केनिया या देशातुन 100 हून अधिक स्पर्धक यात धावले.या स्पर्धेत भारतीय गटात प्रथम क्रमांक भैरवनाथ यादव यांनी ही स्पर्धा एक तास 17 मिनीट 53 सेकंदात पुर्ण केली. दुसरा क्रमांक उत्तम घुजेल, तिसरा क्रं. भास्कर कांबळे, खुल्या गटात महिला विभागात मोनिका राऊत यांनी 1तास 29 मिनिटे 27 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत 50 हजार रूपये मिळवले. दुसरा क्रं. जनाबाई हिरवे व तिसरा क्रं वैष्णवी सावंत यांनी पटकावला. ज्येष्ठ पुरूष गटात 55 ते 64 या वयोगटातील पहिला क्रं. पांडुरंग चौगुले, दुसरा महिपती संकपाळ, तिसरा क्रं. संजय जाधव, ज्येष्ठ महिला गटात (50 ते 59) खुर्शीद मेस्त्री प्रथम, निलम वैद्य द्वितीय, वैजयंती इंगवले तृतीय, पुरूष विशेष ज्येष्ठ गटात (65 ते 99) प्रथम तुकाराम अनुगडे, द्वितीय बाळा भंडारी, तृतीय अशोक राजपूत यांनी मिळवला. महिलांच्या ज्येष्ठगटात (60 ते 99) पुष्पा भट प्रथम,मोसमा रूवाला द्वितीय, तृतीय शालिनी उबाळे यांनी मिळवला. पुरूषांच्या 35 ते 44 वयोगटात भास्कर कांबळे, ज्ञानेश्वर तिडके, मनोहर जेधे हे विजेते ठरले तर महिलांच्या 30 ते 39गटात पायल खन्ना, तन्मया करमरकर, श्वेता सोराळ हे विजेते ठरले, पुरूषांच्या 45 ते 54 वयोगटात हरिश्चंद्र नागोराव भोयार, व उदय महाजन विजेते ठरले तर महिलांच्या 40 ते 49 वयोगटात कृष्णा कोहली, शारदा भोयार व शोभा देसाई हे विजेते ठरले.
21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन ही स्पर्धा पोलीस परेड ग्राऊंडपासून सुरू होवून पोवईनाका, केसरकर पेठ, समर्थमंदिर, बोगदा, निवांत हिल रिसॉर्ट मार्ग यवतेश्वर व प्रकृती रिसॉटहून पुन्हा पोलीस परेड ग्राऊंड अशी संपन्न झाली. या मुख्य धावस्पर्धेनंतर बेटी कोई बोझ नही ही साडेतीन किलोमिटर अंतराची फन रन स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धा संयोजनासाठी सातारा हिल मॅरेथॉन समितीचे अध्यक्ष विठठल जाधव,डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. संदीप काटे, डॉ. प्रताप गोळे, अॅड. कमलेश पिसाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेत सातारा व जावली तालुक्याचे आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या पत्नी श्री.छ. सौ. वेदांतिकाराजे भोसलेही धावल्या. स्पर्धा संपन्न झाल्यावर सातारचे माजी जि.पं मुख्याधिकारी व सध्या अकोल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले,जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील,नगराध्यक्ष विजय बडेकर, उपाध्यक्ष जयवंत भोसले,पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, रविंद्र पिसाळ ,प्रायोजक अजित मुथा आदी मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
सातारा हिल मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा बिरुक जिफार प्रथम
RELATED ARTICLES