सातारा : सातारा नगरपालिका निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या चार तर प्रभागातून 46 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी स्वाती देशमुख आणि राजेंद्र तेली यांनी दिली. परिणामी नगराध्यक्षपदासाठी 7 तर चाळीस प्रभागात नगरसेवकपदासाठी 192 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवारी धनश्री महाडिक यांनी खासदार उदयनराजे आणि दमयंतीराजे यांच्यसमवेत पालिकेत येत आपला उमेदवारी अर्ज मागे घेत साजयांनाच धक्का दिला. यावेळी अनेकांच्या भुवयादेखील उंचावल्या होत्या.
सातारा नगरपालिका निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर शुक्रवारी स्पष्ट झाले. नगराध्यक्षपदासाठी आता फक्त सातच उमेदवार रिंगणात असून खरी लढत नगरविकास आघाडीच्या वेदांतिकाराजे भोसले, सातारा विकास आघाडीच्या माधवी कदम आणि भारतीय जनता पार्टीच्या सुवर्णादेवी पाटील यांच्यातच होत आहे. मनसेच्या शुक्रवारी अर्ज माघारीच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्ज भरलेल्या माधुरी भोसले, काँग्रेसच्या धनश्री महाडिक आणि सुजाता राजेमहाडिक यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी आरती काटे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता येथे फक्त सातच महिला उमेदवार रिंगणात आहेत.
काही मोजके प्रभाग सोडले तर बहुतांशी प्रभागात चौरंगी अथवा बहुरंगी लढत होत आहे. लता बडेकर, अश्विनी कांबळे (प्रभाग 1अ), सुनीलकुमार भंडारी, माधुरी भोसले, समीर भोसले (प्रभाग 1ब), संजय साठे, शरद गायकवाड (प्रभाग 2अ), अर्चना शिंदे (प्रभाग 2ब), भारती सोळंकी (प्रभाग 3अ), शंकर माळवदे, राहुल धुमाळ, संजय साठे, सुजीत जाधव, अपसर बेपारी, राहूल किर्दत (प्रभाग 3ब), भारती सोळंकी (प्रभाग 4अ), मौलाअली डोंगरे (प्रभाग 4ब), प्रतिमा मोरे, शंकर माळवदे, विनोद मोरे, मारुती कारंडे, सचिन माने (प्रभाग 5ब), मंदार चांदणे, संतोष शिंदे (प्रभाग 7अ), राजेंद्र जाधव, अमोल जाधव (प्रभाग 8ब), बंडू पांडेकर, विक्रम बोराटे, उदय भोसले (प्रभाग 9अ), माधुरी भोसले, अनुराधा चव्हाण (प्रभाग 9ब), नीलेश तांबोळी (प्रभाग 11ब), वनिता साळुंखे (प्रभाग 12अ), पोपट मोरे (प्रभाग 13अ), स्नेहल निकम (प्रभाग 14ब), विजयसिंह उथळे (प्रभाग 15ब), सोनाली जांभळे (प्रभाग 16अ), कल्याण राक्षे, चंदन घोडके, नितीन जांभळे (प्रभाग 16ब), धनंजय शिंदे (प्रभाग 18ब), शुभांगी राजेशिर्के, जयवंत ढाणे, तुषार पिलावरे (प्रभाग 20ब) या 43 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार सौ. धनश्री महाडिक तर नगरसेविका पदासाठी अर्ज भरलेल्या भारती सोळंकी यांनी आपले अर्ज मागे घेऊन सातारा विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला यावेळी उपस्थित असलेले खा. श्री. छ. उदयनराजे भोसले होते. (छाया : प्रकाश वायदंडे)