साताराः महाराष्ट्र राज्यातील स्टॅम्प व्हेंडर, पिटीशन रायटर, बॅन्ड रायटर यांना तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्टॅम्प विक्रीच्या मर्यादेत वाढ तसेच कमिशनमध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. खडसे यांचे आश्वासन आता हवेतच विरले असून राज्यातील भाजपा- शिवसेना युती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सुमारे 5,500 स्टॅम्प व्हेंडर, पिटीशन रायटर हे बेमुदत काम बंद आंदोलनाच्या तयारीत असून पुणे येथे दि. 8 जानेवारी रोजी होणार्या स्टॅम्प व्हेंडर महाराष्ट्र राज्य संघटनेच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे अशी माहिती संघटनेचे राज्याचे सचिव दिपक तावरे यंानी दिली.
स्टॅम्प व्हेंडर, पिटीशन रायटर यांना स्टॅम्प विक्रीचा परवाना फक्त 5 हजारापर्यंत आहे. तसेच स्टॅम्प विक्री कमिशन फक्त 3टक्के आहे. यामध्ये वाढ करावी म्हणून तत्कालीन महसुलमंत्री एकनाथ खडसे, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाराष्ट्र राज्य स्टॅम्प व्हेंडर, पिटीशन रायटर संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलने करून मागणी केली होती. खडसे यांनी स्टॅम्प व्हेंडर, पिटीशन रायटर यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. खडसे यांना महसूलमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर खडसे यांचे आश्वासन हवेतच विरले असल्याची चर्चा स्टॅम्प व्हेंडर, पिटीशन रायटर, बॅन्ड रायटर यांच्यामध्ये रंगू लागली आहे.
सातारा जिल्हयात सातारा, कराड, पाटण, कोरेगाव, दहिवडी, माण, वडूज, जावली, महाबळेश्वर, वाई, खंडाळा, फलटण या तालुक्यातील तहसिलदार प्रांत कार्यालयाच्या आवारात स्टॅम्प व्हेंडर, पिटीशन रायटर यांना बसण्यासाठी चांगला निवारा नसल्याने त्यंाची कुचंबना सुरूच आहे. ज्याठिकाणी स्टॅम्प व्हेंडर यांना बसण्यासाठी शेडमधे जागा आहे, तेथे दाटीवाटीने काम करीत असतात. स्टॅम्प व्हेंडर यांचे परवाने नुतनीकरण करताना महसूल अधिकारी यांच्याकडून जाचक अटभ लावून पिळवणूक केली जात आहे. अगोदरच कमी कमिशनमध्ये त्यांना काम करावे लागत असल्याने स्टॅम्प व्हेंडर यांची आज असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था पहायला मिळत आहे. स्टॅम्प विक्रीची मर्यादा 20 ते 25 हजारापर्यंत करावी, कमिशनमध्ये वाढ करावी, या दोन प्रश्नांवर रविवारी पुणे येथे होणार्या राज्य संघटनेच्या बैठकीत निर्णय होवून आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.राज्यात सुमारे 5,500 स्टॅम्प व्हेंडर, पिटीशन रायटर, परवानाधारक असून त्याच्या न्याय व हक्कासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती दिपक तावरे यांनी दिली.