सातारा : मी सातारावासी आहे. मी साताऱ्यातच राहते. माझी मुलेही सातार्यात राहतात. मला तुम्ही साथ द्या. मी गृहिणी आहे. आपल्या घराचे महत्त्व काय असते, हे तिलाच माहित असते. जो प्रयत्न आपण आपले घर सुधारण्यासाठी करतो. तोच प्रयत्न मी सातारच्या विकासासाठी करणार आहे. कारण सातारा माझे शहर नसून ते माझे घर आहे. माझी नगराध्यक्षपदाची उमेदवारी म्हणजे सातार्यातील प्रत्येक महिलेची उमेदवारी आहे, अशी भावनिक साद घालत नगरविकास आघाडीफ तथा नविआच्या उमेदवार वेदांतिकाराजे भोसले यांनी आपली उमेदवारीपाठीमागील भूमिका स्पष्ट केली आणि सातारकरांना नविआच्या मागे उभे राहण्याचे आवाहनही केले.
सातारा नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे आता प्रत्येक राजकीय पक्ष आणि आघाड्यांची चांगलीच धावपळ सुरु झाली आहे. त्यातच सातारा नगराध्यक्षपदाचा नविआचा उमेदवार कोण असेल, याची जाहीरपणे वाच्यता कोठेही झाली नव्हती आणि त्या अनुषंगाने आघाडीचे सर्वेसर्वा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही कधी त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र, शुक्रवारी झालेल्या सातारा शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी अगदी जाहीरपणे वेदांतिकाराजे भोसले सातारच्या नगराध्यक्षपदाच्या आमच्या नविआच्या उमेदवार असतील, अशी घोषणा केली. दरम्यान, या घोषणेनंतर वेदांतिकाराजेंनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी स्वत:ची उमेदवारी का आणि राजघराण्याच्या सत्तेतील सहभाग या अनुषंगाने झालेली टीका यावरही भाष्य केले.
वेदांतिकाराजे म्हणाल्या, सातारा माझे घर आहे. मला नेहमीच सातारकरांनी साथ दिली आहे. यापुढेही मला तुमची साथ हवी आहे. नविआने सत्तेच्या कालावधीत सातारा शहरात चांगले काम केले आहे. मनोमिलन का झाले नाही, याचा उल्लेख आ. शिवेंद्रसिंहराजेंनी केलाच आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही. मात्र, सातारा पालिकेत मनोमिलन असतानाही काम चांगले झाले आहे. मी नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे. माझ्या विजयात साताजयातील प्रत्येक घटकांचा सहभाग असणार आहे. माझ्यावर राजघराण्याच्या अनुषंगाने टीका होत आहे. मात्र, मी झाडू हाती घेवून सातारा शहरातील रस्ते साफ करण्यासही कधी मागे-पुढे पाहिले नाही अन् मला कधी त्याची लाजही वाटली नाही. सातारा शहराच्या विकासात आम्ही नेहमीच आमचे कर्तव्य बजावले आहे.
मी सातारावासी असून मीही सातार्यात राहते. माझी मुले साताजयात आहेत, असे सांगून वेदांतिकाराजे म्हणाल्या, सातारने मला भरपूर काही दिले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष म्हणून काम करताना मला आनंद होणार आहे. सर्वचजण मला मदत करणार अशी माझी खात्री आहे. माझी उमेदवारी म्हणजे सातार्यातील प्रत्येक महिलेची उमेदवारी आहे. मला साथ दद्या. मला तुमची ताकद हवी आहे. तुमच्या ताकदीच्या आणि मतांच्या जोरावरच मी सातारचा विकासाचा पैलू यशस्वीपणे पार पाडणार आहे.
मुंडे, खडसेंची घराणेशाही त्यांना चालते का..?
साताराच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची घोषणा करताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि वेदांतिकाराजे भोसले यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून राजकीय घराणेशाहीचा आरोप करण्यात आला होता. त्याचा समाचारही वेदांतिकाराजे यांनी आपल्या भाषणात घेतला. त्या म्हणाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांना राजकारणात संधी मिळत आहे आणि त्या संधीचे सोने करत आहेत. मात्र, ज्यांचा नवरा आमदार अथवा खासदार आहे, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळणार नाही, असे कुठे नमूद करण्यात आलेले नाही. आमच्यावर आरोप करणाजयांना त्यांच्याच पक्षातील मुंडेंची राजकीय घराणेशाही दिसत नाही. त्यांना खडसेंची राजकीय घराणेशाही दिसत नाही. त्यांना त्यांची घराणेशाही कशी चालते, असा सवालही केला.