श्री स्वामी समर्थ पालखीचे सोमवारी औंध येथे आगमन ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

औंध(वार्ताहर):- सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी श्री स्वामी समर्थ पालखीचे पळशी – खरशिंगे मार्गे सायंकाळी पाच वाजेपर्यंत औंध येथे येणार आहे होणार आहे अशी माहिती येथील श्री स्वामी समर्थ सेवाश्रमचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे व सचिव व खजिनदार मोहन शिदे यांनी दिली.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक – अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २३ वर्षापासून पालखी परिक्रमा आयोजित करण्यात येत आहे. यंदाचे २४ वे वर्ष आहे. ही परिक्रमा महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या राज्यांमधून नऊ महिने चालणार आह

सोमवार दिनांक चार रोजी
सायंकाळी पाच वाजता पालखीचे खरशिंगे रस्त्यावर (येळीव फाट्यावर) औंध
ग्रामस्थांमार्फत स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर

मिरवणुकीने पालखीचे श्री स्वामी समर्थ सेवाश्रम येथे आगमन होणार आहे.त्यानंतर
रात्री ०८.०० वाजता आरती केली जाणार आहे त्यानंतर महाप्रसाद वाटप केले जाणार आहे.
मंगळवार दिनांक ५ रोजी पहाटे ०६.०० वाजता अभिषेक, आरती,सकाळी ०८.०० वाजता पालखीचे सेवेक-यांना चहापान – अल्पोपहार.
सकाळी ०९.०० वाजता पालखीचे पुसेसावळीकडे प्रस्थान होणार आहे.

तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी आणि भाविकांनी दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा आश्रम व औंध ग्रामस्थांनी केले आहे.