‘कराड अर्बन स्पोर्टस्’ च्या खेळाडूंनी केली 5 सुवर्णपदकांची कमाई

कराड: नुकत्याच सातारा येथे संपन्न झालेल्या 65 व्या महाराष्ट्र राज्य शालेय मैदानी स्पर्धेमध्ये कराड अर्बन स्पोर्टस् कल्बच्या खेळाडूंनी भरघोस यश संपादन केले यामध्ये चि.शिवराज राजेश जाधव, आनंदराव चव्हाण विद्यालय गोळाङ्गेक-सुवर्णपदक, कु.राजनंदीनी तुकाराम सोनवणे, विठामाता विद्यालय गोळाङ्गेक-सुवर्णपदक, कु.श्रुती रामचंद्र जाधव, केशवराव पवार इंग्लीश मेडीयम स्कूल, हॅमर थ्रो-सुवर्णपदक, कु.शिवम सूर्यकांत जाधव, वेणूताई चव्हाण कॉलेज 17 वर्षावरील, हॅमर थ्रो-सुवर्णपदक, 5) चि. ओंकार अंकुश देशमुख, वेणूताई चव्हाण कॉलेज 19 वर्षावरील, हॅमर थ्रो-सुवर्णपदक.यशस्वी झालेले सर्व खेळाडू शिवाजी स्टेडीयम आणि वेणूताई चव्हाण कॉलेजच्या क्रिडांगणावर सराव करतात. सहभागी सवर्र् खेळाडूंनी भरपूर मेहनत घेतल्याने संस्थेच्या 5 ही खेळाडूंनी 5 सुवर्णपदके संपादन केली. एकाच संस्थेच्या खेळाडूंनी 5 सुवर्णपदकांची कमाई करणे ही सातारा जिल्हातील प्रथम संस्था आहे. त्याचबरोबर यासर्व यशस्वी खेळाडूंची पंजाबमधील संग्रूर येथे होणार्‍या राष्ट्रीय शाळेय मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली. सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दिलीप चिंचकर आणि संजय राठोड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या दैदीप्यमान यशाबदल त्यांच्या प्राचार्य क्रिडा शिक्षकांनी तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव पाटील, रयत मॅनेजिंग कौन्सीलचे सदस्य रविंद्र पवार, मळाई शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात यांनी अभिनंदन केले.त्याचबरोबर कराड अर्बनचे कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, चेअरमन डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्या हस्ते सर्व यशस्वी खेळाडूंचे सत्कार करण्यात आला. त्यावेळी सेवक संघाचे अध्यक्ष सुहास पवार आणि स्पोर्टस् क्लबचे सचिव जगदीश त्रिवेदी उपस्थित होते. सर्वांनी या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.