Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीकृष्णा कारखान्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कृष्णा कारखान्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कराड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर, तानाजी बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. एम. के. कापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाण दिनापर्यंतचा जीवनपट आपल्या भाषणातून मांडला. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श घेऊन प्रत्येकाने समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन श्री. कापूरकर यांनी केले. तानाजी बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सेक्रेटरी मुकेश पवार, असिस्टंट जनरल मॅनेजर डिस्टीलरी प्रतापसिंह नलवडे, को-जन मॅनेजर गिरीश इस्लामपूरकर, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, स्टोअर किपर जी. बी. मोहिते, सॅनिटरी इन्स्पेक्टर व्ही. जी.पवार, ऑफिस सुपरिटेंडंट निलेश देशमुख, गणेश शिवोत्सवचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, विक्रम थोरात यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तानाजी बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular