जिवंत युवकाला आला त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन, त्याच्या आईला म्हणाले- तुमचा मुलगा गेला

 

फलटण प्रतिनिधी -: शासकीय यंत्रणेच्या अनागोंदी कारभारामुळे सातारा जिल्हा कोरोनाचा खाईत लोटला असताना फलटण मध्ये एक युवक मे 2021 मध्ये कोरोना बाधित झाला होता. मात्र येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बेजबाबदार पणामुळे तो युवक मृत्यू झाला असल्याचा दूरध्वनी खनानला आणि फलटण मध्ये एकच खळबळ उडाली होती.
या बाबत अधिक माहिती अशी की सिद्धांत मिलिंद भोसले वय वर्षे 20 रा.मंगळवार पेठ फलटण हा युवक मे 2021 मध्ये कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला होता,पण तो कोरोनाने मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले व एकच खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासनाने आपल्या अनागोंदी कारभाराचा कहरच केला आहे.या बाबत मिळालेली माहिती अशी की कोरोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या युवकाला त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन आल्याने युवकासह कुटुंबीयांचे धाबे दणाणले व संपूर्ण यंत्रणाच किती बेजबाबदार आहे याचे उदाहरण समोर आले.
एखादा हिंदी चित्रपटाच्या कथानकाला साजेसी ही सत्यघटना फलटण शहरात घडली आहे. फलटण शहरातील मंगळवार पेठेत राहणारा सिद्धांत मिलिंद भोसले (वय २०) असे या युवकाचे नाव आहे. गेल्या महिन्यात त्याची कोरोना टेस्ट पॅझिटिव्ह आली होती. त्याने खासगी रुग्णालयात उपचारही घेतले. गेल्या महिन्याभरापासून तो ठणठणीत बरा हीआहे.दरम्यान आज सोमवारी 7 जून रोजी सिद्धांत घरीच असताना त्याचा मोबाईल खणखणला. फोन त्यानेच घेतला. पलिकडील महिला कर्मचाऱ्याने सिद्धांतचे कोविडने निधन झाल्याची बातमी कळवली. हे ऐकूण सिद्धांतला काही सुचेना. त्याने ‘हे बघ काय सांगताहेत’ असे म्हणत आई सपना भोसले यांना फोन दिला. त्यांनाही तोच निरोप देण्यात आला. आपला मुलगा समोर असताना हे काय अभद्र व बेजबाबदार निरोप देत आहेत,असे म्हणत त्याच्या आईने थेट सरकारी रुग्णालय गाठले. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला आलेल्या यादीप्रमाणे निरोप देण्याचे काम केले आहे, असे सांगत आरोग्य कर्मचाऱ्यांनी हात वर केले. कालपासून भोसले कुटुंब चक्रावलेवल्या अवस्थेत आहे. जिवंत मुलाला मृत घोषित करण्याच्या या प्रकारामुळे भोसले कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यावर रुग्ण व नातेवाईकाना खूप मानस्थाप सहन करावा लागतो, या मुळे फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक व इतर अधिकारी यांच्या वर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

 – मला काल सोमवारी 12 वाजता उपजिल्हा रुग्णालयातुन टेंबरे मॅडम चा माझ्याच मोबाईल वरती फोन आला की,मलाच माझ्या मृत्यूची माहिती दिली या नंतर मला काहीच सुचले नाही, मात्र या धक्क्याने मला व माझ्या आईला काही झाले असते तर ही जबाबदारी सिव्हिल सर्जन डॉ.सुभाष चव्हाण व डॉ.धवन यांनी घेतली असती का?असा जळजळीत प्रश्न सिद्धांत भोसले याने उपस्थित केला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असे सिद्धांत याने सांगितले.