Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीप्रस्थापितांना मतदार राजा गामिनी काव्याने धडा शिकविणार : नरेंद्र पाटील

प्रस्थापितांना मतदार राजा गामिनी काव्याने धडा शिकविणार : नरेंद्र पाटील

वाई तालुक्यातील प्रचारा दरम्यान जनतेशी साधला संवाद
वाई : प्रस्थापितांनी वाई विधानसभा मतदार संघात जनतेची निव्वळ विकासाच्या नावाखाली घोर चेष्टाच केली आहे. या भागातील झालेल्या खर्चिक प्रकल्पांची चौकशी करण्यासाठी पाठपुरावा करणार असून या भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावत वाई-खंडाळा-महाबळेश्वरया विधानसभा मतदार संघात विकासासाठी युतीचे शासन कटिबध्द आहे, खा. उदयनराजे भोसले यांना सातारा जिल्ह्यातील जनतेने दोन वेळा राजा म्हणून त्यांच्या प्रेमा पोटी निवडून दिले. त्याची परतफेड त्यांना करता आलेली नाही. काडीचाही विकास या जिल्ह्यात झालेला नाही उलट सातारा जिल्ह्यासाठी आलेला विकास निधी परत गेलेला आहे. ज्यांच्या मुळे जिल्ह्याचा निधी परत जातो त्यांना जनतेसमोर येण्याची लाज कशी वाटत नाही. शिवसेना-भाजपच्या-आरपीआय पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील मतभेद केव्हाच संपले असूनसंपूर्ण देशात मोदींची लाट आहे.
शिवसेना कार्याध्यक्ष-उद्धवजी ठाकरे यांनी देशात व राज्यात स्थिर सरकार स्थापन व्हावे यासाठी भाजपशी युती केली आहे. विधानपरिषदेचा सदस्य व माथाडी नेता ही माझी ओळख, समाजासाठी करत असलेल्या कार्याची पावती आहे. मी निवडणुकीकडे व्यवसाय म्हणून पाहत नाही. सामाजिक बांधिलकी व उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशामुळेच मी लोकसभेची निवडणूक लढवत आहे. प्रचाराच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क साधत असताना पाटील म्हणाले, विद्यमान खासदारांविषयी जनतेच्या मनामध्ये असंतोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून भोसले यांनी मतदार संघात भरीव निधी गेल्या दहा वर्षात दिला तर नाहीच शिवाय संपर्कही ठेवला नाही. जिल्ह्याचा खासदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्य जनता आम्हाला विचारत आहे.मतदारांमध्ये उदयनराजेंविषयी असलेला नाराजीचा सूर पाहता जिल्ह्यात यावेळी परिवर्तन अटळ असून युतीचा उमेदवार म्हणून मी मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी वाई तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क साधून मतदारांशी संवाद साधला. भाजप-शिवसेना-आरपीआय युतीचे लोकसभेचे उमेदवार-नरेंद्र पाटीलयांच्या समवेत पुनर्वसन राज्यमंत्री- ना. माधव भंडारी, तालुकाध्यक्ष- सचिन घाटगे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष- दिलीप पवार, भाजपचे राज्यकार्यकारिणी सदस्य- अविनाश फरांदे, युवराज कोंढाळकर, किशोर गांधी, महिला तालुका प्रमुख- कोमल गांधी, माया चौधरी, मयूर नळ, शिवसेना वाई शहरप्रमुख- गणेश जाधव, यांच्यासहशिवसेना-भाजपच्या-आरपीआयमहायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular