मायणी:(सतीश डोंगरे मायणी) : खटाव माण तालुक्यातील मुस्लिम बांधवांचा मंगळवार दिनांक पाच रोजी इस्तीमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक समीर नदाफ यांनी दिली .
या इस्तीमामध्ये मुस्लिम धर्माविषयी माहिती देण्यात येणार आहे . पाचवेळा नमाज पठण करण्याबरोबरच मौलाना हे बयान (माहीती) करणार आहेत. या इस्तीमाची तयारी पूर्णत्वाकडे आले असून येथील वडूज रोडलगत भव्य मंडप उभारण्यात आला आहे . वजुखाना, तामखाना,या इस्तिमासाठी लागणार्यासर्व सोयीसुविधा मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात अाल्या अाहेत.
यावेळी मायणी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन गुदगे यांनी ही या ठिकाणी भेट देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ग्वाही दिली.या समिर नदाफ,गणी बागवान,इमरान जमादार,अब्दुल नदाफ,गणी नदाफ, रज्जाक बागवान,हसन बागवान,इस्माईल नदाफ,मेहबुब नदाफ आदी उपस्थित होते.