रोटरी व मैत्री फाऊंडेशनने साधला मोफत सामाजिक विकास
भिलार : सर्वसामान्यांना भेडसावणार्या समस्यांचा वेध घेऊन केलेल्या कामातुन मिळालेले आशीर्वाद हेच पुढील कामाची उर्जा ठरतात. त्यामुळे रोटरी ही सेवाभावी संस्था तळागाळातील आम आदमीची गरज ओळखुन काम करीत आहे. यापुढेही अशाच कामांना प्राधान्य देऊन गावागांवाचा चेहरामोहरा बदलवण्यासाठी आम्ही कटीबध्द राहू असे रोटरी अध्यक्ष जयंवत भिलारे यांनी सांगीतले.
पाचगणी रोटरी आणि मैत्री फौंडेशनच्या सयुक्त विद्यमाने मोफत केलेल्या काटवली येथील गाव ते वाडीला जोडणार्या रस्त्याचे कामांच्या शुभारंभप्रसंगी बेलोशे बोलत होते. यावेळी रोटरीचे अध्यक्ष जयवंत भिलारे, मैत्री फौंडेशनचे अध्यक्ष नितीनभाई भिलारे , माजी अध्यक्ष महेंद्र पांगारे, संदीप बेलोशे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
रोटरी व मैत्री फाऊंडेशनने साधला मोफत सामाजिक विकास
RELATED ARTICLES