मायणी ( प्रतिनिधी ) : प.पू. ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या मातोश्री प.पू. गीताबाई यांचा १२२वा पुण्यतिथी सोहळा रविवार दिनांक १९नोव्हेंबर ते रविवार दिनांक २६ नोव्हेंबर अखेर कलेढोण तालुका खटाव येथील त्यांच्या माहेरी गीतामाई मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.२६नोव्हेंबर या दिवशी गुलालाचा कार्यक्रम होणार आहे .
गेले सप्ताहभर मंदिरात प्रवचन, भजन, सांस्कृतिक , अन्नदानआदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसर पूर्णतः सुशोभित करण्यात आला असून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. फुलांच्या कार्यक्रमासाठी लांब लांब हून भाविक मोठ्या संखेने येत असतात . तरी या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात आले आहे.