साताराः सातारा जिल्हा खारेखरच स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सातारा जिल्हयातील मसूर ता.कराड गावचे तपस्वी स्वातंत्र्यसैनिक कै.र.वि.तथा राघूअण्णा लिमये हे खर्या अर्थाने दिशादर्शक होते. आपली तत्वे, ध्येयापासून ते कधीच ढळले नाहीत. त्याचा हा चरित्र ग्रंथ नव्या पिढीसाठी स्फूतिर्ं ग्रंथ आहे.स्वातंत्र्य संग्रामातील अनेक सैनिक हे स्वातंत्र्य मिळाल्यावर अज्ञात राहीले. कारण या माणसांनी आपल्या तत्वांना सांगड घातली नाही आणि सत्याचे राजकारण करणारे कधीच सत्तेत आले नाहीत. तसेच पेन्शन खाण्यासाठी यांनी देशसेवा केली नाही.अलौकिक व्यक्तिमत्वाचे हे लौकीक दर्शन या पुस्तकाने आपणाला घडत आहे. असे उद्गार डॉ.रामचंद्र देखणे यांनी काढले.
स्वातंत्र्यसैनिक कै.र.वि.तथा राघूअण्णा लिमययांच्या जीवनावरील मसूरची संज्योत या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ श्री.छ. प्रतापसिंह महाराज नगर वाचनालयात आयोजित करण्यात आला होत यावेळी डॉ.देखणे बोलत होते त्यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे,साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर,प्रा.जयंत जोर्वेकर,कार्यक्रमाचे संयोजक घननीळ केळकर यंाची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यंक्रमाची सुरुवात स्व.राघुअण्णा यांचे प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पांजली वाह्ून करण्यात आली. त्यानंतर आपल्या प्रास्ताविकात बोलताना सुरेश साखवळकर म्हणाले की, सातारा जिल्हा हा स्वातंत्र्यसैनिक ांची खाण आहे. ध्येयवादी , तत्वनिष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै.राघूअण्णा लिमये यांनी विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली होती. महात्मा गांधी यांच्या मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, असहकारिता आंदोलन व 1942 ची चले जाव चळवळ यामध्ये भाग घेवून अनेक वर्षे तुरूंगवास भोगला होता. त्याकाळात खडी फोडणे, चक्की पिसणे अशा अनेक खडतर शिक्षा त्यांनी भोगल्या होत्या. स्वातंत्र्यानंतर सत्तेच्या राजकारणापासून ते अलिप्त राहिले होते. त्यांचे चरित्र त्यांच्या कन्या कै.सौ.आशा लिमये-केळकर यांनी लिहून ठेवले होते. त्याचे प्रकाशन आज मसूरची संज्योेत या पुस्तक रूपाने करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले व देशाचे संरक्षणमंत्री झालेले कै. यशवंतराव चव्हाण हे त्यांचे जिवलग मित्र होते. सातारा जिल्हयातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध होते.मसूरची संज्योत या पुस्तकाला विधानपरिषदेचे माजी सभापती कै.वि.स.पागे यांनी प्रस्तावना दिलेली आहे.घननीळ केळकर या राघूअण्णांच्या नातवाने हे पुस्तक प्रकाशन करुन आपल्या परमपित्याच्या ऋणातुन मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक हे अज्ञात राहीले त्यापैकी राघुअण्णा होते.
घननीळ केळकर यांनी आपल्या मनोगतात शालेय जीवनापासून अण्णांनी केलेला स्वातंत्र्य लढ्यासाठीचा निकराचा प्रयत्न, त्यांचेवर आलेली अनेक प्रकारची संकटे असतानाही अविचल ध्येयाने आग्रही भूमिके तून त्याचा जीवन प्रवास या चरित्रातून सादर करण्याच प्रयत्न असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.
आण्णांचे चिरंजीव दिलीप लिमये यांनी सातारा येथील आमच्या घरी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी एकटे येत दिलेली भेट व त्यांना आण्णांनी शिवरायांचा इतिहास व जीवन कसे सांगतिले याची रोमहर्षक कहाणीच यावेळी उपस्थितांपुढे सादर केली.आण्णांनी आदिवासी, भिल्ल,महारोगी, कुष्ठरोगी तसेच निराधारांसाठी केलेले काम मी यापुढे लेखन करुन पुस्तकातुन समाजापुढे आणेन असे सांगितले.
या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्हयाच्या नावलौकीकात भर घालणारे अॅड.डी.व्ही.देशपांडे, अरूण गोडबोले, शिरीष चिटणीस, डॉ.एस.एन.कात्रे, डॉ. बाळ गोसावी, अनिल वाळिंबे, नीलकंठ पालेकर,अॅड.नितीन वाडीकर, रमेश देशपांडे, सौ.वैशाली भट, गजानन केळकर,पदमाकर पाठकजी, प्रमोदभाई शिंदे , वसंतराव जगदाळे, नाथाजी जगदाळे यांचे सत्कारही शाल, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देउन करण्यात आले.
समारंभाचे सुत्र संचालन प्रा.जयंत जोर्वेंकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय लिमये यांनी केले.
समारंभास अनील काटदरे,पुण्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नाना कुलकर्णी, गायक रविंद्र कुलकर्णी, गौतम भोसले, पदमाकर पाठकजी,सुभाष देशमुख, श्री.भट,सौ.गौेरी पालेकर, सौ.काटदरे,मसुर गावचे अनेक मान्यवर ,लिमये परिवारातील सदस्य, सातारचे अनेक ज्येश्ठ स्वातंत्र्यासैनिक, विविध क्षेत्रतातील मान्यवर यांची मोठी उपस्थिती होती. सामुदायिक राष्ट्रगीताने या कार्यंक्रमाची सांगता झालीे.
सत्याचे राजकारण करणारे कधीच सत्तेत आले नाहीतः डॉ. रामचंद्र देखणे
RELATED ARTICLES