Sunday, May 18, 2025
Homeठळक घडामोडीमान्सून मॅडनेस रॅलीतील जिप्सी पलटीः पाच जण जखमी

मान्सून मॅडनेस रॅलीतील जिप्सी पलटीः पाच जण जखमी

 मॅडनेस रॅली  की, गाड्यांची रेसः सातारकरांचा सवाल
साताराः सातारा ते परळी मार्गे भांबवली कास अशी आयोजीत केलेल्या मॅडनेस मान्सुन रॅलीततील भरघाव वेगात असलेली जिप्सी परळी गावाजवळ एका वळणावर पलटी झाली. या आपघातात गाडीतील पाच जण जखमी झाले आहेत. दरम्यान मँडनेस रँलीत सहभागी झालेल्या जिप्सी गाड्या व टू-व्हिलर पोवई नाक्यावरून सुसाट वेगात धावत होत्या. काही युवक नशेतच हुल्लडबाजी करत शहरात एका चाकावर दुचाकी चालवून स्टंटबाजी करुन चालवत होते.  त्यावेळी बोगदा मार्गे पोवई नाक्याकडे येणार्‍या वाहनचालकांना तारेवरची कसरत करत तर पादचार्‍यांना आपला जीव मुठीत घेवून चालावे लागले. आयोजकांनी मान्सुन मँडनेस रँली की, गाड्यांची रेस आयोजीत केली होती. असा सवाल सातारकर नागरिकांमधून केला जात होता.
सातार्‍यात रविवार दिं. 21 रोजी पोवई नाका ते सातारा ते परळी निञळ, बांबर, केळवली, जळकेवाडी, जुंगटी,भांबवली, तांबी,कासवरून सातारा अशी  मान्सुन मँडनेस रँलीचे आयोजन केले होते. रँलीत पुणे, कोल्हापूर, कराड येथील हौसी जिप्सी चालक गाडीवर लाखो रूपये खर्च करून रँलीत सहभागी झाले होते. या रँलीला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पोवई नाक्यावरून सुरूवात झाली. रँलीत टू-व्हिलर चाकांचा मोठा सहभाग होता. नाक्यावरून निघालेल्या गाड्या सुसाट वेगाने सर्मथ मंदिर बोगदा मार्गे परळीच्या दिशेने निघाल्या होत्या. पोलीसांनी या मान्सुन मँडनेस रँलीला परवानगी देताना रँली दिवशी  परळीसह ग्रामीण भागातून सातारकडे येणार्‍या वाहन धारकांना कसलीही पुर्व कल्पना दिली नव्हती. त्यामुळे पोवई नाक्यावरून सुसाट वेगात आलेल्या गाड्यामुळे अन्य वाहन चालकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागले. रँलीत सहभागी झालेले युवक शहरातून एका चाकावर गाडी चालवून स्टंटबाजी करत होते. तर सुसाट वेगातील वाहनांमुळे पादचा-यांना रस्ता ओलांडताना आपला जीव मुठीत घेवून जावे लागत होते.

 

सातारा मान्सुन मँडनेस रँलीचे आयोजन केले त्या रँलीचा उद्देश काय याची जाणीव सहभागी झालेल्या स्पर्धकांना आणि आयोजकांना होती का? ही मान्सुन मँडनेस रँली की, गाड्यांची रेस आयोजीत केली होती असा सवाल सातारकर करत आहेत. रँलीत सहभागी झालेले स्पर्धक हे मद्यप्राशन करूनच गाड्या सुसाटपणे चालवत होते. अशा रँलीला पोलिसांनी शहरातून परवानगी दिलीच कशी. अपघाताची घटना शहाराबाहेर घडली. शहरात घडली असतीतर याची जबाबदारी रँलीला परवानगी देणार्‍या यंञणेने घेतली असती का? अशा प्रतिक्रीया जनतेतून उमटत आहेत.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular