Saturday, May 17, 2025
HomeUncategorizedशहीद जवान मन्सूर जहांगीर आगा यांच्या पुण्य स्मरणार्थ खुली मॅरेथॉन स्पर्धा

शहीद जवान मन्सूर जहांगीर आगा यांच्या पुण्य स्मरणार्थ खुली मॅरेथॉन स्पर्धा

खटाव : येथील शहीद जवान मन्सूंर जहांगीर आगा यांच्या पुण्य स्मरणार्थ रुस्तमशाह बाबा उरुस कमिटी यांचे तर्फे खुली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये मुलासह मुलींचाही लक्षणीय सहभाग होता.
या स्पर्धेत जिल्ह्याच्या विविध भागातुन 240 स्पर्धेकांनी हजेरी लावली होत. या स्पर्धेकरीता मुलींना स्पर्धेचे अंतर 3 किलोमीटर तर पुरुष स्पर्धकांना 5 किलोमीटर अंतराची मर्यादा ठेवण्यात आली होती. या मध्ये 25 मुलींनी आपला सहभाग नोंदवला होता. या मध्ये प्रथम क्रमांक स्नेहल हिरवे, मांढरदेवी (1001 रु व स्मृतीचिन्ह), व्दितीय क्रमांक विशाखा साळुंखे (701 व स्मृतीचिन्ह), तृतीय क्रमांक हर्षदा जाधव (501 व स्मृतीचिन्ह, चौथा क्रमांक सेजल मांढरे, पाचवा क्रमांक प्रतिक्षा मांढंरे सहावा क्रमांक जयश्री राठेड यांनी पटकवला तर मुलांमध्ये पथिम क्रमांक स्वप्नील सावंत, सातारा (5001 व स्मृतीचिन्ह ), व्दितीय क्रमांक कय्युम शेख, सातारा (3001 व स्मृतीचिन्ह ) तृतीय क्रमांक आदिनाथ भोसले, मांढरदेवी (2001 व स्मृतीचिन्ह तसेच भैरवनाथ यादव (सातारा), आकाश हिरवे (मांढरदेवी), सागर कोचळे (माढंरदेवी) संभाजी पाटोळे मायणी, भोसले (दहिवडी) महेश माने (सातारा), सागर बेंद्रे (कराड), सागर कोकरे (कराड) यांनी प्रथम दहा मध्ये येण्याचा बहुमान पटकवला.
या स्पर्धेसाठी खटावसह सातारा, मांढरदेवी, कराड, ललगुण, मायणी, वडुज, कोरेगाव, दहिवडी, धरपुडी आदि भागातून स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सरपंच सुवर्णा पवार, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, उपसरपंच बबनराव घाडगे, सुरज देशमुख, नारायण चव्हाण, हाजी मोहाम्मद हानीफ, रुस्तमशाह उरुस कमिटीचे अध्यक्ष नफीज काझी, सय्यद आगा, जहागिंर आगा, सिकंदर मुलाणी, शमशुद्दिन मुल्ला, कॅप्टन धुमाळ आदि मान्यवरांचे हास्ते करणेत आले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular