सातारा: येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या शिवाजी विद्यापिठ इंटरझोनल बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीने 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदके अशी एकूण 17 पदके पटकावत स्पर्धेचे सांघिक विजेतेपद पटकावले.
विविध वजनगटात झालेल्या या स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे खेळाडू प्रतीक भोसले, विनोद राठोड, मनोज ढाणे, मधूर भोसले, किरण शेडगे, पूजा शिंदे, पूनम शेडगे यांनी सुवर्णपदक पटकावले. या खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापिठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. सर्व खेळाडूंना सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप, सहायक प्रशिक्षक विनोद दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, असिस्टंट कमांडंट डॉ. प्रशांत जगताप, सपोनी भूषण आडके, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे हरिष शेट्टी, दौलत भोसले, अमर मोकाशी, रविंद्र होले, डॉ. राहूल चव्हाण, विजय मोहिते, संजय पवार, अजय जाधव, उमाकांत नलवडे आदी पदाधिकारी व मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.