धोम (ता. वाई) या गावातील संतोष पोळ हा सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील होता. घराची परिस्थिती बेताची, मित्रमंडळी कमी अबोल व खुनसी स्वभावाचा गूढ व्यक्तीमत्व होते.वैद्यकीय शिक्षण बेताचे परंतु हुशार व्यवक्तीमत्व असल्याने त्याने खुणासारखी बेमालूम कृत्य त्याने केली आहेत. 2003 पूर्वी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून तो वाई तालुक्यात वडवली या दुर्गम भागात त्याने दवाखाना थाटला.त्या ठिकाणी त्या भागाची पार्श्वभूमी लक्षात घेवून अज्ञानी ग्रामीण लोकांचा गैरफायदा घेवून त्याने महाभयंकर एड्स सारख्या रोगावर औषध देण्यास सुरुवात केली.कारण या भागातील बहुतांश लोक कामानिमित्त मुंबई येथे असल्याने त्या गोष्टीचा फायदा तो घेत महिलांनाच भीती घालून स्वताच्या जाळ्यात घेऊन घेत असे व जी पहिली महिला याला बळी ठरली ती सुरेखा चिकणे यानंतर महिलांच्या खून सत्राचा सिलसिला सुरु झाला तो आज पर्यंत चालू आहे. व मंगल जेधे यांच्या खुनाने सिलसिला थांबला. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने त्याच्या मास्टर माइंडने पैसा कमविण्याचे साधन या निराधार व असह्य महिला.
संतोष पोळ याची बहिण धोम मध्येच हागवणे यांच्या घरात दिलेली आहे.मेहुण्याच्या भावाचा जेसीबी.हा खड्डे काढण्यासाठी वापरला होता.त्याचे आई-वडील हयात नाहीत. त्याला पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी आहे. घरातील पती पत्नीचे वातावरण म्हणावे तसे चांगले नव्हते. कारण हा स्त्री लंपट होता. म्हणूनच त्याने जास्तीत-जास्त महिलांचाच वापर केला.