सातारा : सातारा शहरालगत असलेल्या उपनगरातील विलासपूर ग्रामपंचायतीमध्ये कचरा उचलण्यासाठी घंटागाडया व ट्रक्टर नेमले आहेत. यातील काही घंटागाडी चालक हे त्रिशंकू भागात कचरा उचलण्यासाठी सोसायटया व कॉलन्याकडून महिना 50 रुपये घेतात. परंतु आता चक्क त्यांनी ग्रामपंचायतीच्या 100 मीटर अंतरावरही हा फतवा काढला आहे. त्यामुळे विलासपूरमधील रहिवाशी अवाक झाले आहेत. काही लोकप्रतिनिधींकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये लेखी तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी होवू लागली आहे.
शहराची हद्दवाढ होत नसल्याने त्रिशंकु व सातारा शहरालगतच्या गावांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. असाच शहरालगत असलेल्या विलासपूरमध्ये समस्यांचा डोंगर आहे. ग्रामपंचायतीकडून नेहमीच विकासकामे होत असल्याचे दाखवले जाते. नजिकच असलेल्या शाहुनगरातील काही कॉलनी व अपॉटमेंटमध्ये जावून या ग्रामपंचायतीच्या घंटागाडया विनंतीवरुन कचरा गोळा करतात. त्याही विनंतीवरुन. परंतु या भागात काही लोक पैसे भरुनही त्यांच्याकडील कचराच नेला जात नाही, विशेषतः सौभाग्य मंगल कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कॉलन्यामध्ये हा प्रकार दररोज सुरु आहे. त्यामुळे या परिसरात आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. तसेच पोलीस वसाहतही या परिसरात असून गोळीबार मैदानावरील या पोलीस वसाहतीमध्ये कचरा उचलण्याची समस्या आहे. आता तर चक्क या ग्रामपंचायतीच्या घंटागाडी चालकांनी केवळ 100 मीटर अंतर असलेल्या कॉलन्यामध्ये रहिवाशांना 50 रुपये प्रतिमहिना मागण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुन वादावादीही काही रहिवाशांशी झाली. त्याबाबत काही नागरिकांनी या भागातील लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली असता त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये लेखी तक्रार करण्याचा अजब सल्ला दिला. त्यामुळे नक्की गोलमाल कशामध्ये आहे, याचीच चर्चा सुरु आहे.
विलासपूरमध्ये घंटागाडी नाही ट्रक्टर आहेत
विलासपूर ग्रामपंचायतीमध्ये घंटागाडी नाहीत. तर ट्रक्टर आहेत. त्रिशंकु भागातील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येतात. जी तक्रार आली आहे. त्याची खात्री करुन चौकशी केली जाईल. त्यानुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण यांनी सांगितले.
कचरा उचलण्यास घंटागाडी चालक घेतात 50 रुपये
RELATED ARTICLES