Sunday, March 23, 2025
HomeUncategorizedउद्याच्या पिढीसाठी गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे - शिवव्याख्याते विशाल सुर्यवंशी

उद्याच्या पिढीसाठी गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे गरजेचे – शिवव्याख्याते विशाल सुर्यवंशी


नागनाथ विद्यालयात गडकिल्ले प्रदर्शन
बुध– इतिहासाचे साक्षीदार असणारे गडकिल्ले हे महाराष्ट्राचे प्राणवायु आहेत.शौर्याचे,पराक्रमाचे,बलिदानचे प्रतिक असणारे गडकोट आजही आम्हाला प्रेरणादायी आहेत.स्वराज्याचे रखावालदार असणारे गडकिल्ले धारातिर्थ पडाले असुन उद्याच्या पिढीला या गडकिल्ल्यांचा जाज्वल्य इतिहास संक्रमित करण्यासाठी हे शिवरायांचे गडकोटांचे संवर्धन करणे गरजे आहे असे मत इतिहासाचे अभ्यासक विशाल सुर्यवंशी यांनी व्यक्त केले
बुध येथिल नागनाथ विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या गढकिल्ले मॉडेल प्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी
प्राचार्य कोरडे सर, मुख्याधिपीका सौ जगदाळे, श्री भोसले सर, दडस सर, माने सर यांच्यासह पालक,विद्यार्थी उपस्थित होते..
यावेळी विशाल सुर्यवंशी म्हणाले विद्यार्थ्यांच्यात इतिहासाविषयी प्रेम आणि गडकिल्ल्यांविषयी आदर निर्माण करण्यासाठी गडकिल्ले मॉडेल प्रदर्शन हा उपक्रम नाविण्यपुर्ण आहे. शिवरायांचा तेजस्वी इतिहासाचे साक्षीदार असणारे गडाकोटाच्यां सानिध्यात आपणास चैतन्य येते. अनेक मावळ्यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या गडकोटांवर महीण्या दोन महीण्यातून गेले पाहीजे असेही ते म्हणाले
यावेळी या गढकिल्ल्यांचे परीक्षण इतिहास अभ्यासक विशाल सुर्यवंशी यांनी केले या प्रदर्शनात 40 ते 45 विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभागामुळे नागनाथ विद्यालयात शिवमय वातावरण झालेआहे. रायगड,विजयदुर्ग,सिंधुदुर्ग,पुरंदर,लोहगडाच्या हुबेहूब प्रतिकृती नागरीकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जवळजवळ 42गडकिल्ल्यांच्या माध्यमातून इतिहास बोलता झाल्याचे वातावरण शिवभक्तांना प्रेरणा देत आहे.
दगड,माती,विटां बरोबर थर्माकॉलचा प्रभावी वापर केल्याने गडकिल्ल्यांना जिवंतपणा आल्याचे पाहायला मिळत आहे.डोंगरी किल्ल्यांबरोबर जलदुर्गही आपले वेगळेपणा ठळकपणे दाखवत आहेत
या प्रदर्शनात नळदूर्ग,विजयदुर्ग,सिंधूदुर्ग,प्रतापगड, लोहगड इतिहासा प्रेमी नागरिकांच्या कौतूकास प्राप्त ठरत आहेत या प्रदर्शन स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक सिद्देश जगताप, व्दितीय आतिफ सय्यद,तृतीय साहील कुंभार, तर उत्तेजनार्थ श्रध्दां जगदाळे,मेहर पठाण, यांनी यश मिळवले तर लहान गटामध्ये प्रथम क्रमांक दिव्या जगताप,व्दितीय क्रमांक राज इंगळे,तृतीय क्रमांक गोरख पांडेकर यांनी मिळवला तर उत्तेजनार्थ स्वरा माने हीने यश मिळवले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular