İstanbul escort bayan sivas escort samsun escort bayan sakarya escort Muğla escort Mersin escort Escort malatya Escort konya Kocaeli Escort Kayseri Escort izmir escort bayan hatay bayan escort antep Escort bayan eskişehir escort bayan erzurum escort bayan elazığ escort diyarbakır escort escort bayan Çanakkale Bursa Escort bayan Balıkesir escort aydın Escort Antalya Escort ankara bayan escort Adana Escort bayan

Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedसक्षम उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी

सक्षम उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी

वडूज/धनंजय क्षीरसागर : खटाव तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व 12 पंचायत समिती गणासाठी दोन दिवसांपूर्वी आरक्षण सोडत झाली. या सोडतीतील निकालामुळे अनेक ठिकाणी सक्षम उमेदवारांना लढण्याची संधी प्राप्त झाल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये आहे.
मायणी जिल्हा परिषद गटासाठी ओ.बी.सी. आरक्षण आहे. या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रदादा गुदगे राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसकडून त्यांचे बंधू सचिन गुदगे, शंकरराव माळी, संजय साळुंखे, तर महायुतीकडून संजय गुदगे, विजय कवडे चर्चेत आहेत. मायणी गण सर्वसाधारण आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीकडून शिवाजीशेठ शिंदे, उपसरपंच संजय पवार, विक्रम पवार महायुतीकडून अ‍ॅड. हणमंतराव जाधव, युवा नेते हिम्मतराव देशमुख, पृथ्वीराज पवार तर काँग्रेसकडून सुरज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. कलेढोण गणासाठी संजय साळुंखे, टी. आर. गारळे, धनाजी माळी यांच्या कुटुंबातील महिलेसह मुळीकवाडीचे सरपंच बाळासाहेब पुकळे यांच्या पत्नी स्वाती पुकळे, माधुरी राजेंद्र लोखंडे, बशिरा रफीक मुलाणी यांची चर्चा आहे.
निमसोड जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान सभापती मनिषा सिंहासने, जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुनराव खाडे यांच्या स्नुषा कल्पना विजय खाडे, तडवळेच्या सरपंच छाया महादेव पाटील या स्पर्धेत आहेत. महायुतीकडून मांडवेच्या सरपंच भागुबाई सदाशिव खाडे, भाग्यश्री अर्जुन पाटील, स्नेहल राजेंद्र कुंभार, कमल लक्ष्मण शिंगाडे, सारिका धनंजय क्षीरसागर, मनिषा विश्‍वनाथ उर्फ नाना पुजारी तर काँग्रेसकडून वनिता सुभाष माने, वनिता रविंद्र राऊत, सातेवाडीच्या माजी सरपंच नंदा हणमंतराव कोळेकर यांच्या नावाची चर्चा आहे.
निमसोड गणासाठी मिनाक्षी काकासाहेब मोरे, वासंती जनार्दन मोरे, धनश्री मोहनराव देशमुख, अदिती अभिजीत देशमुख, शारदा रामभाऊ देवकर, प्रिया आनंदराव देवकर, शशिकला हणमंतराव भोसले, लतिका धनाजी लवळे आदि महिलांची नांवे चर्चेत आहेत. कातरखटाव गण सर्वसाधारण खुला असल्या कारणाने या ठिकाणी कातरखटावचे सरपंच तानाजीशेठ बागल, उपसरपंच संतोष बागल, माजी उपसरपंच हिंदुराव बोडके, धनंजय चव्हाण येरळवाडी, राजेश निकम, विष्णूपंत निकम, विजय शिंदे सर्व डाळमोडी, अंकुशराव दबडे, डॉ. नितीन जगदाळे पेडगांव, नामदेव खाडे मांडवे अशी इच्छुकांची भाऊगर्दी राहणार आहे.
खटाव गट ओ.बी.सी. प्रवर्गासाठी राखीव झाल्याने युवा नेते प्रदिपआण्णा विधाते यांना जिल्हा परिषदेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव कुदळे, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटोळे, उद्योगपती पांडुरंग दळवी, दिपक विधाते, किशोर डंगारे यापैकी एक पर्याय निवडण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. खटाव पंचायत समिती गणासाठी पंचतारा ढाब्याचे मालक विजय बोबडे, प्रमोद कांबळे चर्चेत आहेत. विसापूर गणासाठी उंबरमळेचे सरपंच नवनाथ वलेकर, संतोष साळुंखे, गणेश सुतार, देवेंद्र बुधावले सर्व विसापूर, संतोष मदने जाखणगांव, संतोष शिर्के, संतोष चव्हाण कोकराळे यांची नांवे चर्चेत आहेत.
औंध गट अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षीत आहे. या ठिकाणी डॉ. बाळासाहेब झेंडे, सुनिल नेटके, शिवाजी सर्वगोड, सत्यवान कमाने, दिलीप साठे, मोहन कनवाळू, सुरेश इंगळे इच्छुकांच्या शर्यतीत आहेत. औंध गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला आहे. या ठिकाणी उपसरपंच राजेंद्र माने, पै. संदिप मांडवे, वसंतराव गोसावी, गणेश शिंदे, कृष्णराव देशमुख, यशवंत देशमुख, प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. ओ.बी.सी. महिलेसाठी आरक्षीत असलेल्या सिध्देश्‍वर कुरोली गणासाठी अर्चना हरिदास बनसोडे, भक्ती संतोष जाधव, प्रमिला वसंतराव पाटोळे, राणी पाटोळे, मिनाक्षी काळे, आशा राजेंद्र खटावकर, विमल बळीराम वाघ गुरसाळे आदी महिलांसह कुरोलीचे माजी सरपंच आण्णा हिरवे, डॉ. सुजित ननावरे यांच्या घरातील महिलेच्या उमेदवारीबाबत चर्चा आहे. पुसेसावळी गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीने आ. प्रभाकर घार्गे यांच्या पत्नी इंदिरा घार्गे तर काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते धैर्यशिल कदम यांच्या पत्नी माजी सभापती सुनिता कदम यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. पंचायत समिती गणासाठी नंदा सुर्यकांत कदम अथवा जितेंद्रदादा पवार यांच्या घरातील उमेदवारीची शक्यता आहे. म्हासुर्णे गणात सी.एम.पाटील, तुषार माने, नाथाभाऊ माने, महादेव माने यांच्या घरात राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविण्यासाठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात चोराडेचे सुहास पिसाळ यांच्या घरातील उमेदवारी व सर्व विरोधकांचे एकमत होवू शकते.
पुसेगांव गटासाठी राष्ट्रवादीतर्फे माजी सभापती प्रभावती चव्हाण, बाजार समितीचे संचालक राजेंद्र कचरे यांच्या भावजयी सुनिता विजय कचरे स्पर्धेत आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीतर्फे पुसेगांवच्या सरपंच दिपाली भरत मुळे रिंगणात येवू शकतात. तर काँग्रेसमध्ये माजी उपसभापती लहुकुमार मदने, बुधचे माजी सरपंच अशोकराव पुरे, संतोष तारळकर यांच्या घरातील उमेदवारीबाबत चर्चा आहे. पुसेगांव गणासाठी महिला आरक्षण आहे. या जागेवर राष्ट्रवादीच्या वतीने वैशाली फडतरे पुन:श्‍च्य मैदानात येवू शकतात. त्यांच्या विरोधात महायुतीकडून सुनिता केशव जाधव, लक्ष्मी अर्जुन मोहिते तर काँग्रेसकडून वेटणेचे सरपंच पौर्णिमा मनोज नलवडे अथवा संजय जाधव सर यांच्या घरातील उमेदवाराची शक्यता आहे. बुध गणात राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी नेहमीप्रमाणे कैलास घाडगे व प्रदिप उर्फ पांडुशेठ गोडसे यांच्यामध्ये घमासान होण्याची शक्यता आहे. महायुतीतर्फे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हणमंतराव शिंदे, माजी तालुकाप्रमुख पै. जालिंदर गोडसे, मेघराज निकम, प्रवीण घाडगे यांची नांवे चर्चेत आहेत. काँग्रेसतर्फे शिवाजी शेडगे, धनाजी घाडगे यांच्या नावाची चर्चा आहे. अंतिम चित्र अर्ज भरल्यानंतर स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत बैठका, चर्चा, विचार विनिमय या माध्यमातून येरळा पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular