मुंबई:- दीड हजार सीसी क्षमतेची चारचाकी गाडी वापरणाऱ्यांना स्वयंपाकाचा अनुदानित गॅस सिलेंडर न देण्याचा विचार सुरू असल्याचे सुतोवाच केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी केले. तसेच स्वयंपाकाचे गॅस अनुदान परत करण्याच्या ‘गिव्ह इट अप’ योजनेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन गरीबांच्या घरात स्वयंपाकाचा गॅस पोहचावा म्हणून या योजनेत स्वतःहून सहभाग घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चारचाकी वाहनधारकांना गॅस सबसिडीतून वगळण्याचा विचार : धर्मेंद्र प्रधान
RELATED ARTICLES