Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीवाई पंचायत समितीच्या सभापतीपदी रजनी भोसले, तर उपसभापतीपदी अनिल जगताप

वाई पंचायत समितीच्या सभापतीपदी रजनी भोसले, तर उपसभापतीपदी अनिल जगताप

वाई: पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडी मंगळवार दि. 14 रोजी पंचायत समितीच्या किसनवीर सभागृहात पिटासन अधिकारी तहसीलदार अतुल म्हेत्रे यांच्या अध्यतेखाली जाहीर करण्यात आल्या. सभापतीपदी भुईंज गणातील रजनी सुधीर भोसले, उपसभापतीपदी केंजळ गणातील अनिल बुवासाहेब जगताप यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर आ. मकरंद पाटील यांच्या हस्तेनूतन सभापती, उपसभापती यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक- नितीन पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष- प्रतापराव पवार, बाजार समितीचे सभापती- मोहनराव जाधव, उपसभापती- दीपक बाबर, जिल्हा परिषद सदस्या संगीता मस्कर. शारदा ननावरे, रंजना डगळे, प्रकाश दिनकर चव्हाण, पंचायत समिती सदस्य- मधुकर भोसले, विक्रांत डोंगरे, संगीता चव्हाण, सुनिता कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य- शशिकांत पवार, माजी सभापती सत्यजित वीर, विजयसिंह नायकवडी, माजी उपसभापती- महादेव मस्कर, रवींद्र जाधव, बाजार समितीचे संचालक- कुमार जगताप, राजेश शिंदे, अमोल कदम, अशोक मांढरे, रमेश गायकवाड, किरण गायकवाड, किरण जाधव, किरण काळोखे, अ‍ॅड.निलेश डेरे, दिलीप मोरे बाजीराव महांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 दरम्यान सकाळी अकरा वाजता सभापती पदासाठी दोन अर्ज व उपसभापती पदासाठी एक अर्ज भरण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादीच्या भुईंज गणातून सौ. रजनी सुधीर भोसले काँग्रेसच्या शेंदूरजणे गणातून ऋतुजा विराज शिंदे यांनी अर्ज भरला त्यामुळे सभापती पदासाठी निवडणूक होणार ने नक्की झाले असताना शिंदे यांनी दुपारी अडीच वाजता आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने राष्ट्रवादीच्या रजनी भोसले यांची सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली.
तर उपसभापती पदासाठी एकच अर्ज राष्ट्रवादीचे केंजळ गणातील अनिल बापूसाहेब जगताप यांचा भरला असल्याने त्यांचीही निवड निवडणूक अधिकारी श्रीमती आरती भोसले यांनी बिनविरोध जाहीर केली.
वाईपंचायत समितीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी पुरस्कृत सभापती व उपसभापती पदांची वर्णी लागून राष्ट्रवादीचाच बोलबाला होवून आ. मकरंद पाटील यांची सत्ता निर्विवाद आली आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular