खटाव: माणुसकीची भिंत या उपक्रमा अंतर्गत बुध ता.खटाव येथे वनसंपदा फाउडेशन आणि सातारा जिल्हा युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यामाने उस तोडणी कामगारांना कपडे वाटप करण्यात आले.
दर वर्षी प.महाराष्ट्रत उस तोडणी करता विदर्भ मराठा वाडयातुन उस तोड कामगारांच्या टोण्या दाखल होत असतात. अशा पध्दतीच्या उस टोळ्या आल्या असुन या उस टोळीतील सदस्यांना दर वषीं मदतीचा हात म्हणुन माणुसकीच्या माध्यमातुन कपडे तसेच उबदार कपड्याडचे वाटप केले जाते. या ही वर्षी या कामगारांना वनसंपदा फाउडेशनचे वतीने मदतीचा हात देउन कपडे वाटप करण्यात आले. या वेळी वनसंपदा फाउडेशनचे अध्यक्ष आणि भाजपा युवा मोर्चाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष धीरज जाधव ,शहर अध्यक्ष जीवन जाधव, शरयु अॅग्रो इंडस्टीज लि.कापसीचे महेश जगदाळे काटेवाडचे उपसरपंच प्रदीप इंगळे,अनील जगदाळे, हमीद मुल्ला, विकास पांडेकर,आदिसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
या माणुसकीच्या भिंतीतुन धीरज जाधव यांनी सुरु केलेला या उपक्रमामुळे या उस तोड कामगारांच्या चेहर्यावर एक वेगळेच चैतन्य दिसुन येत होते. त्यांनी या उपक्रमा बद्दल वनसंपदा फाउडेशंन व सातारा जिल्हा युवा मोर्चा यांचे आभार मानले.