म्हसवड : जल हैं तो कल हैं ..या धोरणानुसार सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2019 मध्ये वळई सर्व ग्रामस्थ माता-भगिनी युवा वर्ग सर्व ताकतीनिशी सहभागी झाला आहे.
पाणी कोण देणार, पाणी मी देणार..पाणी कोण अडवणार, मी अडवणार..दुष्काळ कायमचा हटवनार अशा ध्येयांनी प्रेरित होवून, वळई गाव या स्पर्धेमध्ये तन-मन-धनाने सामील झाले आहे…पहाटे चार वाजल्यापासुनच सर्व ग्रामस्थ आपल्या परिने लवकर उठुन जणजागृतीला सुरवात करतात.
माण तालुका हा जगाच्या पाठीवर कायम स्वरुपी दुष्काळी तालुका म्हणुन औळखला जातो. या तालुक्यातील वळई हे असंच दुष्काळाचे चटके सहन करणार गाव. परंतु यावेळी गावाला पाणीदार करण्यासाठी गावीतील सर्व युवा वर्ग, स्ञी-पुरुष व ग्रामस्थ कामाला लागले आहेत.
सिने अभिनेते अमीर खान यांच्या संकल्पनेतून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात 8 एप्रिल ते 22 मे दरम्यान 45 दिवस चालणार आहे.या स्पर्धेमध्ये वळई ग्रामस्थांनी मोठ्या हिंमत्तीने सहभाग घेतला आहे. रोज सकाळी 7 ते 10 या वेळेत 400 -500 लोक श्रमदान करतात. श्रमदान करणार्यांची संख्या रोज वाढतच आहे.युवकांच्या बरोबर वडिलधारी मंडळी वयस्कर मडंळी या कामासाठी योगदान देत आहेत.सर्वांच्या मदतीने या कष्टाचे नक्कीच चीज होईल भविष्यात गाव पाणीदारच होईल.