(छायाः अतुल देशपांडे)
साताराः कौशिक प्रकाशनच्या वतीने सातारा येथून गेली 3 वर्षे आयोजीत करण्यात आलेली व दिवसेंदिवस संपुर्ण राज्यात प्रसिध्द होत असलेली ज्येष्ठ नागरिकांसाठीची लेखन स्पर्धां ही आता चळवळ झाली पाहीजे. आता केवळ सातार्यातून नव्हे तर राज्यातील सर्वच जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघांनी याचे प्रतिनिधीत्व करावे. या वैचारिक,अनुभवपूर्ण लेखनातुन सजगता, सृजनशीलता आणि सर्जनशीलता वृृध्दींगत होत आहे असे उदगार ज्येष्ठ शास्त्रज्ञ, विचारवंत,समीक्षक आणि लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी काढले.
सातारा येथील अरुण गोडबोले यांच्या कौशिक प्रकाशनचे वतीने घेण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या लेखन स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून दाभोलकर बोलत होते.प्रतापसिंह उद्यानातील ज्येष्ठ नागरिक भवनात झालेल्या या सोहळयात याप्रसंगी फेस्कॉमचे श्रीराम बेडकिहाळ, अरुण गोडबोले,ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री. लोमटे, परीक्षक श्रीधर साळूंखे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात आपल्या प्रास्ताविक भाषणातून करताना अरुण गोडबोले म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकंाच्या अनुभवातील लेखनाला चालना मिळावी तसेच त्यांना उत्तेजन व विरंगुळा मिळावा यामधून ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली .त्याला अतीशय चांगला प्र्रतिसाद सर्वच ठिकाणाहून मिळत आहे. विचाराला चालना आणि मराठी भाषेचे संवधर्ंन यातून हा प्र्रतिसाद वाढत आहे. आता राज्यातील मोठ्या वृत्त समुहांनी आपल्या दैनिकांत असे उपक्रम ज्येष्ठांसाठी सुरु करावेत तसेच दर रविवारचे पुरवणीचे एखादे पान ज्येष्ठांना त्यांच्या लेखनासाठी दिल्यास मोठा प्रतिसाद ही मिळेल आणि त्याचे कौतुकही होईल. यावर्षी या स्पर्धेत 175 लेख आले. अनेक चांगले वाईट अनुभवांचे हे लेखन.. मी आणि माझे समाज कार्यं, मुलांना कसे वाढवावे आणि माझी फजिती ..या तीन विषयांवर आहेत. आजची पिढी ही मोबाईल कॉम्प्ुयटरमध्ये अडकली आहे. आता मुलांना नव्हे तर नातवांना कसे वाढवावे याचा विचार घरातील आजी आजोबांनी करावा,कारण याचा चांगली पिढी निर्माण होण्यात मदत होईल .या स्पधर्ंेत मुंबई, पुणे, सांगली, चिपळूण, पेठवडगाव, किर्लोस्कवाडी आदी ठिकाणाहून स्पर्धक सह़भागी झाले. आता हे लेखन एका चांगल्या प्रकारच्या पुस्तकाद्वारे संग्ऱहीत होणे हीच अपेक्षा आहे.
यावेळी सर्व मान्यवर तसेच स्पर्धेचे परिक्षक श्रीधर साळुंखे यांचा सत्कार अरुण गोडबोले यांनी पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन केला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक व प्रत्येकी 1 हजाराचा पुरस्कार पेठ वडगाव येथील बबन आण्णापा गाताडे व मिरज येथील सौ.पुष्पा नंदकुमार प्रभूदेसाई यांनी मिळवला. द्वितिय क्रमांक व प्रत्येकी 750 रुपयांचा पुरस्कार दादर मुंबई येथील डॉ.अर्चना परुळकर व क्षेत्रमाहुली येथील विनोद गोविंदराव प्रभुणे यांनी मिळवला. तृतीय क्रमांक व 500 रुपये सांगली येथील स्मिता विनोद गोडबोले व पुणे येथील सौ अनुराधा गोखले यांनी तर 200 रु. चा उत्तेजनार्थं पुरस्कार बेळगाव येथील शिवाजी हलगेकर, निनाम पाडळी येथील शंकररराव शिंदे, भाईंदर येथील सौ.शोभना कारंथ,सातारा येथील सुजाता दांडेकर,सांगली येथील बंडा यज्ञोपवीत, कोडोली येथील नारायणराव मुळे, किर्लोस्करवाडी येथील जहांगीर संदे व रामनगर येथील लक्ष्मण रोकडे यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी या स्पर्धेसाठी विशेष परीश्रम घेणारे प्रदीप चव्हाण, सौ.अनीता दाभाडे, पोपट धोंदवड आणि जयवंत नारकर यांनाही मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
परिक्षक श्रीधर साळुंखे यंनी आभाळाएवढी मोठी माणसे सातारा येथे आहेत, या लेखन स्पर्धेंसाठी सर्वच सहभागी ज्येष्ठांनी आपले महिनाभराचे लक्ष यासाठी केंद्रित केले आणि त्यांच्या अनुभवांना मला तपासण्याच्या कामातून त्यांच्या हाताला माझ्या हाताने स्पर्श करण्याचे भाग्य लाभले. आज हा मोठा मोलाचा आणि आनंददायी अनुभव मला मिळाला. कारणे सांगण्याशिवाय काम करण्याची कला असणारे असे अरुण काका हे खर्या अर्थाने ज्येष्ठांच्या मावळतीच्या आयुष्यातील दिवस अश्या उपक्रमांच्या संयोजनातुन समाधान व आत्मचिंतन करणारे करत आहेत. या स्पर्धेत 93 व्या वर्षीही उत्साहाने लेखन करणारे तीन स्पर्धंक सहभ़ागी झाले याचा आनंद वाटतोअसे आपल्या मनोगतात सांगितले. तर विजेत्या स्पर्धकांनी आपले मनेागत व्यक्त करताना या स्पर्धेत मिळणारा सन्मान हा उतारवयातही प्रेरणा देणारा व मोठी आनंदाची अनुभूती देणारा आहे, या लेखनाचे खरोखरच पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे असे पुस्तक तयार करावे व त्यासाठी आपण याला आर्थिक मदत करु अश्या शब्दात आपले विचार मांडले.
फेस्कॉमचे श्रीराम बेडकिहाळ यांनी या उपक्रमासाठी मी वैयक्तिक आणि पुण्यातील सर्वच ज्येष्ठ नागरिक संघ सहकार्यं करु, तसेच राज्यातील सर्वच विद्यापीठांनी ही स्पर्धा वाढावी यासाठी उपक्रम राबवू असे आपल्या भाषणात सांगितले. यावेळी अचर्ंना परुळेकर आणि डॉ.दत्तप्रसाद दाभोलकर यांनी या लेखांचे पुस्तक निर्मितीचे उपक्रमासाठी वैयक्तिक अनुक्रमे रुपये 750 व 1 हजाराची मदत जाहीर केली. समारंभाचे सुत्रसंचालन मधूकर बाजी यांनी केले.तर आभार अरुण गोडबोले यांनी मानले. समारंभास माजी प्राचार्यं पुरुषोत्तम शेठ,कवी आनंदा ननावरे, गौतम भोसले, माधवी लिमये,वाय.के. कुलकर्णी,श्री मायणे,विजय रणदिवे,सौ.अनुपमा गोडबोले,श्री. लेवे सर, श्री.व सौ.आयाचित, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदींची उपस्थिती होती.