उंब्रज येथे सशस्त्र दरोडा ; वृद्ध महिलेचा खून

सातारा : उंब्रज येथे रात्री एका बंगल्यात सशस्त्र दरोडा पडला . या दरोड्यामध्ये चोरट्यानी  २५ ते ३० तोळे सोने चोरले असून यात एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा खूनही केल्याची घटना घडली आहे. सदर  घटना रात्री १. ३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या चोरीच्या घटनेमुळे उंब्रज परिसरात खळबळ उडाली आहे. उंब्रज मध्येच अन्य दोन ठिकाणीही घरफोडी झाली आहे.  उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास यंत्रणा कामाला लागली आहे . या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आहे .