कोरेगाव : रशिया येथे झालेल्या वर्ल्ड पॅन्क्रेशन चॅम्पियनशीप 2017 कुस्ती स्पर्धेत सुमीत सदानंद भोसले (वेळू, ता.कोरेगाव) पंचक्रोशी शिक्षण मंडळ रहिमतपूरचा विद्यार्थ्याने यश मिळविले आहे. फ्री स्टाईल प्रकारात रौप्य व ग्रीका रोमन प्रकारात कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेतून त्याची राष्ट्रकुल स्पर्धेच्या चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पधेसाठी जगभरातील 28 देशांनी सहभाग नांदिवला होता. सुमीतने भारताचे प्रतिनधित्व करीत हे यश संपादन केले आले आहे. सुमीत भोसले सध्या बारावी विज्ञान शाखेमध्ये शिकत आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.