कराड : माहिती आणि तंत्रज्ञान युगात युवक हा केंद्रस्थानी दिसत आहे. शिक्षणासारख्या धारदार शस्त्राच्या जोरावर भारतातील युवाशक्ती दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या स्वप्नातील महासत्ता भारत निर्माण करण्याच्या कार्यात मोठया प्रमाणावर सहभागी आहे. युवकांनी सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे मत ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहालयक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी व्यक्त केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजीत जयंती सोहळयाच्या दुसर्या सत्रामध्ये युवकांसमोरील आव्हाने या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.
परीसंवादाचे अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष रमेश उर्फ महादेव सातपुते होते. व्यासपीठावर समितीचे निमंत्रक प्रकाश वायदंडे, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील, कार्याध्यक्ष दिलीप सकटे, हरिभाऊ बल्लाळ, विकास मस्के, दत्ता भिसे (फौजी), बबलू उर्फ बबन भिंगारदेवे, पारधी मुक्ती आंदोलनाचे कैलास पवार, दिलीप चव्हाण, बाबासाहेब लोंढे, प्रकाश भिंगारदेवे यांची उपस्थिती होती.लोखंडे यांनी युवकांच्यातील ऊर्जा कोणत्याही संघर्षावर मात करू शकते. छ. शिवाजी महाराजांची न्याय निष्ठूरता व लढवलयी वृत्ती तर बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यासू वृत्ती या महापुरूषांचा आदर्श डोळयासमोर ठेवण्यासह आपल्या आई-वडिलांचे ॠण मानून आपल्या कतृत्वाने स्वत:चा, समाजाचा व राष्ट्राचा विकास करावा, असे विचार मांडले. अल्पशिक्षित असूनही अण्णाभाऊ साठे यांनी कथा कादंबर्यातून सार्या जगाला आचंबित केले.
संयुक्त महाराष्ट्र लढयातील अण्णाभाऊ साठे यांचे योगदान प्रत्येक मराठी माणसाने विसरता कामा नये. नवसाहित्य निर्मितीसाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक प्रा.पै. अमोल साठे यांनी केले, स्वागत संतोष माने यांनी केले, सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी केले. तर आभार केशव पाटे यांनी मानले.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणे ही युवकांची नैतिक जबाबदारी: स्वप्निल लोखंडे
RELATED ARTICLES