फलटण : बरड, ता. फलटण येथे गोट्या उर्फ गुलाब भंडलकर रा. गुणवरे ता. फलटण या युवकास काल अज्ञातांनी गोळी घालून गंभीर जखमी केले होते. या गोळीबार प्रकरणी अद्याप संबंधित हल्लेखोर कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या गोळीबार प्रकरणाने गुणवरे येथे तणावाचे वातावरण असून आज गुणवरे येथे काही काळ बंदही पाळण्यात आला.
या बाबतची अधिक माहिती अशी की, गोट्या उर्फ गुलाब भंडलकर (वय 35) याच्यावर काल सायंकाळच्या सुमारास बरड गुणवरे मार्गावर बरड गावच्या हद्दीतील ओढ्याजवळ पाठीमागून अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता, यामध्ये भंडलकर गंभीर जखमी झाला होता. त्याला फलटण येथील एका खासगी रूग्णालयात तात्काळ हलविण्यात आले होते. खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले होते. गोट्यावर झाडण्यात आलेली गोळी त्याच्या पाठीमागे कमरेतून घुसून पोटातून बाहेर पडली असल्याची व गोळी लागल्यावरही गोटया मोटारसायकलवरुन त्याच अवस्थेत घटनास्थळावरुन जखमी अवस्थेत बरडा पोलीस ठाण्या पर्यंत आला असल्याची चर्चा आहे.
सदर गोळीबार नक्की कोणत्या कारणासाठी व कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हा हल्ला गुणवरे गावातील वर्चस्ववादातून झाल्याचे समजत आहे. सदर प्रकारानंतर घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांनी भेट दिली. घटनास्थळावरुन पोलीसांनी पुंगळी जप्त केली असून ती अधिक तपासनी साठी पुण्यातील फोरेन्सिक लँब मध्ये पाठविन्यात आली आहे.या आहवालानंतर हल्लेखोरांनी नेमके कोणत्या प्रकारचे पिस्तुल वापरले हे समोर येण्याची शक्यता आहे. भंडलकर याच्यावर झालेला हल्ला हा पुर्व वैमन्यस्यातून आहे का? याचाही तपास होत आहे. या गोळीबाराच्या निषेधार्थ आज गुणवरे गावात काही काळ बंदही पाळण्यात आला.
गोळीबार प्रकरणाने गुणवरे येथे तणावाचे वातावरण; काही काळ बंद पाळला
RELATED ARTICLES