सातारा : मंगळवार पेठ येथे काल रात्री दोन गणेश मंडळात झालेल्या तुंबळ हाणामारीत 15 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात दोन्ही मंडळातील 25 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीसांनी रात्री परिसर पिंजून काढत 25 जणांना अटक केली आहे. या दोन्ही मंडळाचे पोलीसांनी परवाने रद्द केले आहेत.
दि. 5 रोजी मंगळवार पेठेतील सोनी गिरणीजवळ न्यू राजहंस गणेश मंडळ व होलार समाज परवीर गणेश मंडळ यांची मिरवणूक समोरासमोर आली. ट्रॅक्टर ट्रॉली मागे-पुढे घेण्याच्या कारणावरून दोन्ही मंडळातील कार्यकर्त्यांची बाचा-बाची झाली. मात्र तेथील उपस्थित असणार्यांनी मध्यस्थी करून ती भांडणे मिटवीली. दरम्यान या भांडणाचा राग मनात धरून काल रात्री 11.30 च्या सुमारास दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर तुटून पडले. यात तलवार, दांडके, दगड, अशा हत्त्यारांचा वापर झाला. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीसांनी या घटनेची माहिती समजताच शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र पिसाळ, बेंद्रे, एलसीबीचे पद्माकर घनवट, डी.वाय.एस.पी धरणे, व 40 पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळावर जावून परिस्थिती आटोक्यात आणली. शाहुपूरी पोलीस ठाण्यात न्यू राजहंस गणेश मंडळाचे कार्यकर्ते विजय बाळु केंडे वय 50 रा. मंगळवारपेठ यांच्या फिर्यादीवरून शिवराज सांडगे वय 27, दिंगबर सांडगे वय 53, विजय नलवडे वय 26, प्रशांत तोरणे वय 19, गणेश अहिवळे व 29, सौरभ जमदाडे वय 24, रवि माने वय 29, राहुल कटवळे वय 22, चेतन गेजगे वय 22, विक्रम औटे वय 28, राजन सांडगे वय 25, शिवाजी अहिवळे वय 28 सर्व रा. मंगळवार पेठ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. होलार समाज गणेश मंडळाचे कार्यकर्ते शिवाजी बाळु अहिवळे यांच्या फिर्यादीवरून विजय केंडे वय 40, संतोष केंडे वय 35, रा. मंगळवारपेठ शुभम ढाणे चिमणपुरा पेठ, रणजित नलवडे, मेघशाम केंडे, अब्दुल रहिमान उर्फ अनिष बागवान, श्रीकृष्ण पिलावरे, आदित्य शिंदे, संजय केंडे, ज्ञानेश्वर नलवडे, प्रसाद नलवडे, सर्व रा. मंगळवार पेठ यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही मंडळातील आरोपींना पोलीसांनी अटक केली असून सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वरील दोन्ही मंडळाचे परवाने पोलीसांनी रद्द केले आहेत.